जावयाची अडचण झाली तर मुलीला अडचण होणार : शिवेंद्रसिंहराजे

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे निंबाळकरांचे जावई आहेत.
shivendraraje
shivendraraje

सातारा : आम्ही मुलगी दिली त्यामुळे सगळे जावई मोठे झाले आहेत, असे रामराजे म्हणतात. त्यामुळे रामराजेंनी जावयावर लक्ष ठेवले पाहिजे. जावयाची अडचण झाली तर मुलीला अडचण होणार आहे, असा मिश्‍किल चिमटा साताऱ्याचे भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांना काढला.

मेढा (ता. जावळी) येथे आमदार जी. जी. कदम यांच्या स्मृतिदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. अध्यक्षस्थानी विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर होते. यावेळी पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, उपाध्यक्ष प्रदीप विधाते,शशिकांत शिंदे, सदाशिव सपकाळ, वसंतराव मानकुमरे उपस्थित होते.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, सातारा-जावलीच्या विकासकामांत कधीच राजकारण येणार नाही. पालकमंत्री बाळासाहेब पाटील हे कधीही राजकारण आणणार नाहीत. रामराजे म्हणतात तर आम्ही मुलगी दिली त्यामुळे सगळे जावई मोठे झाले. त्यामुळे त्यांनी जावयावर लक्ष ठेवले पाहिजे. जावयाला अडचण झाली तर मुलीला अडचण होणार आहे, असा चिमटा काढून ते म्हणाले, श्रीनिवास पाटील यांचे सर्वांना सहकार्य असते. भाऊसाहेब महाराजांपासून त्यांचे आम्हाला सहकार्य मिळालेले आहे.''

जिल्ह्यात अलीकडच्या काळात खुनशी राजकारण वाढू लागले आहे, अशी खंत व्यक्त करून  रामराजे म्हणाले, राज्याच्या विकासासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेससारखा पक्ष नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार भल्याभल्यांना समजणार नाहीत. विकास हे न संपणारे व्रत आहे. जिल्ह्याच्या राजकारणाला आदर्श संस्कृती आहे. यशवंतराव चव्हाणांपासून आमदार जी. जी. कदम यांनी ती घातली. त्याच संस्कृतीचे जतन आज त्यांचे पुत्र अमित कदम करत आहेत. ही अभिमानास्पद बाब आहे.''

पालकमंत्री पाटील म्हणाले, " माझ्याकडे पालकमंत्रिपद आहे. त्यामुळे पालक म्हणून जिल्ह्यात डावे उजवे करता येणार नाही. त्यामुळे बाबाराजे आपण काळजी करू नका. आपणाला निधी कमी पडू देणार नाही. अडचणीत असताना स्वर्गीय भाऊसाहेब महाराज व बाबाराजे आपण केलेली मदत विसरता येणार नाही.''  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com