shivendrarajes ganesh festival | Sarkarnama

शिवेंद्रसिंहराजेंच्या 'सुरुची'त आले चांदीचे गणराज! 

सरकारनामा ब्युरो
गुरुवार, 13 सप्टेंबर 2018

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुरुची या निवासस्थानी पारंपरिक चांदीच्या गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. पाच वर्षापासून ते या मूर्तीची स्थापना करत आहेत. 

सातारा : आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सुरुची या निवासस्थानी पारंपरिक चांदीच्या गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. पाच वर्षापासून ते या मूर्तीची स्थापना करत आहेत. 

शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी यानिमित्ता पर्यावरण पूरकता जपली आहे. त्यांच्या घरी पर्यावरण पूरक गणेशोत्सव त्यांचे वडील कै. आमदार अभयसिंहाराजे भोसले यांनी सुरु केला. त्यावेळी शाडूच्या गणेशमूर्तीची स्थापना केली जात होती. मात्र शिवेंद्रसिंहराजे व पत्नी वेदांतिकाराजे भोसले यांनी शाडूच्या मूर्ती ऐवजी आपण चांदीच्या मूर्तीची स्थापना का करू नये, असा विचार करून पाच वर्षापूर्वी ही चांदीची मूर्ती बनवून घेऊन तिची स्थापना केली. या मूर्तीचे नदीमध्ये विसर्जन केले जाते पण ती पुन्हा घरी आणून ठेवतात. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख