शिवेंद्रसिंहराजेच्या भाजपमध्ये जाण्याचा `या' नेत्यांनी घेतला धसका

साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे भाजप प्रवेशाचे निश्चित झाल्यामुळे त्यांचे प्रभुत्व असलेल्या कोरेगाव आणि कराड उत्तर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. आता आपले काय होणार या भीतीने त्यांना ग्रासले आहे. तर दुसरीकडे भाजपमधुन इच्छुक असलेले महेश शिंदे आणि मनोज घोरपडे यांची मात्र आनंदाने कळी फुलली आहे.
शिवेंद्रसिंहराजेच्या भाजपमध्ये जाण्याचा `या' नेत्यांनी  घेतला धसका

सातारा : साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे भाजप प्रवेशाचे निश्चित झाल्यामुळे त्यांचे प्रभुत्व असलेल्या कोरेगाव आणि कराड उत्तर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार प्रचंड अस्वस्थ झाले आहेत. आता आपले काय होणार या भीतीने त्यांना ग्रासले आहे. तर दुसरीकडे भाजपमधुन इच्छुक असलेले महेश शिंदे आणि मनोज घोरपडे यांची मात्र आनंदाने कळी फुलली आहे. 

सातारा, कोरेगाव आणि कराड उत्तर मतदारसंघात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे वर्चस्व आहे. कारण पूर्वीच्या सातारा तालुक्यातील दोन तीन जिल्हा परिषद गट कोरेगाव आणि कराड उत्तर मतदारसंघात समाविष्ट झाले आहेत. या गटावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे अजिंक्यतारा कारखाना आणि  भाऊसाहेब महाराजांचे जुने जाणते कार्यकर्ते यांच्या माध्यमातून वर्चस्व आहे. या सोबतच खासदार उदयनराजे भोसले यांचेही काही प्रमाणात वर्चस्व आहे.  पण राष्ट्रवादीचे शिवेंद्रसिंहराजे यांना मानणारे कार्यकर्ते त्यांच्यासोबत भाजपमध्ये जाणार हे निश्चित आहे. अश्या वेळी आमदाराची सातारा तालुक्यातील ताकतीचा जी कोरेगाव आणि कराड उत्तर मतदारसंघात विभागली आहे, तिचा भाजपच्या उमेदवारांना फायद्याचा ठरणार आहेत.
  
कोरेगाव मतदारसंघात सातारा तालुक्यातील पाटखळ,कोडोली, वनवासवाडी हे गट पूर्ण आणि खेड निम्मा, वर्णे गटातील काही गावे यांचा समावेश असून येथे एक लाख सहा हजार मतदान आहे. तर कराड उत्तर मध्ये सातारा तालुक्यातील नागठाणे, वर्णेचा निम्मा भाग असून येथील 35 हजार मतदान आहे. त्यामुळे या दोन ठिकाणी शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे लाखभर मतदान आहे. त्यामुळे ते भाजपमध्ये गेल्यास त्यांच्यासोबत राष्ट्रवादीतील त्यांचे समर्थक भाजप मध्ये जाणार का हा प्रश्न महत्वाचा आहे. त्यामुळे आमदार बाळासाहेब पाटील यांना थोर फार तर कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांनाच जास्त अडचणीचे ठरणार आहे. तर भाजप मधून इच्छुक असलेले महेश शिंदे आणि मनोज घोरपडे यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.

महेश शिंदे यांनी स्वतःच्या बळावर आपली ताकत निर्माण केली आहे. त्यांना या निमित्ताने शिवेंद्रसिंहराजे यांची ताकत मिळणार आहे. तर मनोज घोरपडे हे पूर्वीचे खासदार उदयनराजे भोसले यांचे समर्थक आहेत, येथे त्यांना उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे यांची ताकत विधानसभेला मिळाले. आमदार शिवेंद्रसिंहराजे भाजप मध्ये गेल्यास कोरेगाव आणि कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादी चे आमदार अडचणीत येणार आहेत. त्यामुळे या दोघांत सध्यातरी अस्वस्थता पसरली आहे. 

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले हे भाजपमध्ये गेले तर त्यांच्यासोबत त्यांचे सातारा तालुक्यासह जावलीतील समर्थक जाणार का, हा प्रश महत्वाचा आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना अडविण्यासाठी आमदार शशिकांत शिंदे यांना प्रयत्न करावे लागतील. अन्यथा राष्ट्रवादीच्या आयत्या कार्यकर्त्यांवर भाजप कोरेगाव, सातारा, कराड उत्तरमध्ये आमदार निवडून आणण्याचे स्वप्न पूर्ण करतील.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com