शिवेंद्रसिंहराजेंची प्रकृती स्थिर; पुढील उपचारासाठी मुंबईला 

ShivendraRaje Sent to Mumbai for Treatement
ShivendraRaje Sent to Mumbai for Treatement

सातारा : साताऱ्याचे  भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना अचानक उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्याने साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटलमध्ये उपचार केल्यानंतर आज सकाळी मुंबईला अधिक उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आले आहे. त्यांची प्रकृती स्थिर असून इतर चाचण्या करण्यासाठी त्यांना मुबईला हलविण्यात आल्याचे त्यांच्या निकटवरतीयांनी सांगितले. 

मंगळवारी फलटण येथून कामानिमित्त शिवेंद्रराजे भोसले गेले होते. तेथून ते जेवण करून साताऱ्यात आल्यावर रात्री साडेआठच्या सुमारास त्यांना छातीत जळजळ होऊन त्यांचा बीपी अचानक वाढले. तसेच त्यांना घमही आला.  त्यामुळे त्यांना साताऱ्यातील प्रतिभा हॉस्पिटल मध्ये दाखल केले होते. आयसी यु मध्ये उपचार सुरू होते.  

त्यांची अंजियोग्राफी करण्यात आली. मात्र त्यामध्ये काहीही सापडले नाही. पण रक्तदाब का वाढला याचे कारण शोधण्यासाठी त्यांना सकाळी मुंबईला हलविण्यात आले आहे. सध्या त्यांची तब्बेत स्थिर असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नयेत असे आवाहन त्यांच्या निकटवर्तीयांनी केले आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com