शिवेंद्रराजे  म्हणाले , राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्यातील बुरुज आता कोसळत आहेत

Shivendraraje
Shivendraraje

सातारा : आपली भूमी त्यागाची आहे. ही भूमी शहीदांची आहे. आपल्याला क्रांतिकारी निर्णय करून दाखवायचा आहे. आता सातारा जिल्ह्याला नरेंद्र मोदींचा परिस्पर्श झाल्याने  सातारचे सोने होणार आहे, असा विश्वास सातारा विधानसभेचे भाजपचे उमेदवार शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या उपस्थित साताऱ्यात झालेल्या महाजनादेश संकल्प सभेत शिवेंद्रराजे बोलत होते

शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सातारा येथील सभा म्हणजे एक ऐतिहासिक क्षण आहे. लोकांची गर्दी प्रचंड आहे. आपल्याला आता विजयाची काही अडचण नाही. आपण सर्वानी विजयाचे फक्त साक्षीदार नको तर भागीदार व्हायचे आहे. सातारा बालेकिल्ला होता आता तो संपला असल्याचे गर्दीवरून स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीचे सातारा जिल्ह्यातील बुरुज आता कोसळत आहेत. त्याची तटबंदी ढासळू लागली आहे. आपण आता किल्ला जिंकणार आहे. मनात जिद्द कायम ठेवा. वेगळी ओळख निर्माण करू. 

श्री. भोसले पुढे म्हणाले, गेल्या पाच वर्षात भ्रष्टाचार मुक्त सरकार आपण पाहिले आहे. भाजप त्यात यशस्वी झाले आहे. ३७० कलम रद्द झाले. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. देशाची अखंडता ज्यांनी राखली, देशभक्ती जागवली. जगात आपली प्रतिमा निर्माण केली. जेवढा विश्वास त्यांनी आपल्यावर ठेवला तेवढे बळ आपण मोदींना देऊया. आपली भूमी त्यागाची आहे. ही भूमी शहीदांची आहे. आपल्याला क्रांतिकारी निर्णय करून दाखवायचा आहे. सातारा जिल्ह्याला मोदींचा परिस्पर्श होणार असून त्यामुळे सातारचे सोने होणार आहे. आपली ताकद दाखवून देऊया. त्यांच्यावर होणारी टीका आपण त्यांना काहीतरी देऊ आणि त्यांचे हात बळकट करू.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com