शिवेंद्रसिंहराजेंचा भाजपप्रवेश 27 ऑगस्टला?

आता दीपक पवारांची शिवेंद्रसिंहराजेंना अडचण राहिलेली नाही.
शिवेंद्रसिंहराजेंचा भाजपप्रवेश 27 ऑगस्टला?

पुणे: सातारा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा भाजपप्रवेश 27 ऑगस्टला होवू शकतो. तशी माहिती भाजप वर्तुळातून मिळाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिवेंद्रसिंहराजे यांच्या भाजपप्रवेशाची चर्चा सुरू आहे, मात्र गेल्या दोन दिवसांपासून यावर ठोसपणे बोलले जात आहे. काल भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी कऱ्हाड येथे पत्रकार परिषद घेवून शिवेंद्रराजेंवर राष्ट्रवादीने केलेल्या अन्यायाचा पाढा वाचला. याचवेळी दीपक पवार यांना राज्यमंत्री दर्जाचे महामंडळ मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे सांगितले. 

दीपक पवार हे शिवेंद्रसिंहराजे यांचे विरोधक आहेत. 2014 ला ते साताऱ्यात लढले होते. यंदा शिवेंद्रसिंहराजेच भाजपमध्ये येणार असल्याने पहिल्यांदा दीपक पवार यांची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आता दीपक पवारांची शिवेंद्रसिंहराजेंना अडचण राहिलेली नाही. शिवेंद्रसिंहराजे यांचे निकटवर्तीयही भाजपप्रवेशाला दुजोरा देत आहेत.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 1 ऑगस्टपासून महाजनादेश यात्रा काढत आहेत. ही यात्रा 27 ऑगस्टला साताऱ्यात येत आहे. सायंकाळी 5 वाजता त्यांची गांधी मैदानावर सभा होणार आहे. यावेळी शिवेंद्रसिंहराजे भाजपप्रवेश करतील, असे भाजपकडून सांगण्यात आले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com