shivendraraje happy on udyanraje rajyasabha ticket 
shivendraraje happy on udyanraje rajyasabha ticket 

उदयनराजेंच्या उमेदवारीचा शिवेंद्रसिंहराजेंना आनंद

उदयनराजेंच्या खासदारकीचा आमच्या जिल्ह्याला फायदा होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

सातारा : माजी खासदार उदयनराजे भोसले यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी जाहीर केल्यामुळे त्यांचे चुलत बंधू आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना आनंद झाला आहे. उदयनराजेंच्या खासदारकीचा आमच्या जिल्ह्याला फायदा होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

भाजपने नऊ जणांची राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली. यामध्ये साताऱ्याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांचा समावेश आहे. या उमेदवारीमुळे त्यांचे राजकीय पुनर्वसन होणार आहे. यासंदर्भाने शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, उदयनराजेंना खासदारकीची उमेदवारी मिळाल्यामुळे आमच्या जिल्हाला फायदाच होणार आहे. त्यांच्या माध्यमातून केंद्र सरकारची कामे सातारा जिल्ह्यात होतील. त्यामुळे आमचा जिल्हा पुन्हा प्रगतीच्या दिशेने वाटचाल करून अग्रेसर राहिल. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com