एकच राजे बाबाराजे..च्या जयघोषात शिवेंद्रसिंहराजेंचा भाजप प्रवेश 

एकच राजे बाबाराजे..च्या जयघोषात शिवेंद्रसिंहराजेंचा भाजप प्रवेश 

मुंबई/सातारा : मुंबईतील गरवारे क्‍लब येथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थिती साताऱ्याचे राष्ट्रवादीचे नेते शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज सकाळी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांना भाजपचा मफलर घालून देवेंद्र फडणवीस यांनी त्यांचे स्वागत केले.
 
यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, शिक्षणमंत्री विनोद तावडे, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे नरेंद्र पाटील, तसेच साताऱ्याचे राजू भोसले, अविनाश कदम, भाजपचे नगरसेवक धनंजय जांभळे, डॉ. दिलीप येळगावकर, यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. 

यावेळी झालेल्या कार्यक्रमात भाजपच्या सर्व नेत्यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे कौतूक करताना छत्रपती शिवाजीमहाराजांचे वंशज आज आपल्या पक्षात आले असून त्यामुळे आपला पक्ष बळकट झाला असून आगामी काळात त्यांना अपेक्षित विचारांची पाठराखण आम्ही सर्वजण करू, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांसह सर्वांनीच दिली. यावेळी एकच राजे बाबाराजे...अशा जयघोषणात शिवेंद्रसिंहराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com