पदभार स्वीकारताच शंभूराज देसाईंना शिवेंद्रसिंहराजेंनी भरविला सातारा कंदीपेढा

भाजप व शिवसेना युतीचे सरकार सत्तेत पुन्हा आले असते तर शिवेंद्रसिंहराजे व शंभूराज देसाई दोघेही मंत्री झाले असते. आता महाविकास आघाडीचे सरकार असल्याने शंभूराज देसाई यांना संधी मिळाली आहे
Shivendraraje Giving Sweets to Shambhuraje Desai
Shivendraraje Giving Sweets to Shambhuraje Desai

कोयनानगर : गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी आज आपल्या मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारला. या नंतर सातारा विधानसभेचे भाजपाचे आमदार छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांना सातारी कंदीपेढा भरवून शुभेच्छा दिल्या.

एरव्ही आघाडी आणि युतीतील आमदार ओघानेच एकमेकांच्या कार्यक्रमास उपस्थित राहतात. मात्र भाजपसोबत फारकत घेऊन शिवसेनेने काँग्रेस व राष्ट्रवादीशी हात मिळवणी करत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आले. मात्र भाजपची सत्ता पुन्हा येईल आणि विकास कामना गती मिळेल या उद्देशाने भाजपमध्ये गेलेले आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा भ्रमनिरास झाला आहे. मात्र कोठेही असले तरी विकास कामे करण्याची धमक त्यांच्यात असल्याने त्यानी आपले विकास कामांसाठी मंत्रालयात जाऊन ती मार्गी लावण्यावर जोर आजही कायम ठेवला आहे. 

सातारा शहराच्या हद्दवाढीच्या प्रश्नाबाबत शिवेंद्रसिंहराजे आज मंत्रालयात  गेले होते. पण नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे कार्यक्रमानिमित्त बाहेर असल्याने त्यांची गाठ पडली नाही. उद्या मंत्रिमंडळाचे विशेष अधिवेशन असल्याने उद्याच मंत्री शिंदे यांची भेट होणार असल्याने शिवेंद्रसिंहराजे मुंबईत थांबले आहेत. नेमके आजच पाटणचे आमदार शंभूराज देसाई यांनी आज मंत्रालयात जाऊन गृहराज्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला. यावेळी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी त्यांच्या दालनात जाऊन शुभेच्छा दिल्या. तसेच सातारी कंदी पेढाही भरविला.

भाजप व शिवसेना युतीचे सरकार सत्तेत पुन्हा आले असते तर शिवेंद्रसिंहराजे व शंभूराज देसाई दोघेही मंत्री झाले असते. आता महाविकास आघाडीचे सरकार असल्याने शंभूराज देसाई यांना संधी मिळाली आहे. विकासकामात पक्ष आडवा येत नाही, एकाच जिल्ह्यातील दोन नेते एकमेकांना सहकार्य करणार, हे आजच्या या दोघा नेत्यांच्या भेटीतून स्पष्ट झाले.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com