कलम 370 रद्द हीच शहिदांना श्रध्दांजली : शिवेंद्रसिंहराजे 

सातारा जिल्हा हा शूरवीर जवानांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील हजारो युवक सैन्यदलात सेवा बजावत आहेत. तसेच असंख्य जवानांना देशाचे रक्षण करताना सीमेवर वीरमरण आले आहे. अनेक जवान अतिरेकी हल्ल्यांमध्ये शहिद झाले आहेत. जम्मू काश्‍मिर हाच दहशतवादाचा मुख्य मुद्दा असून आज मोदी सरकराने जम्मू आणि कश्‍मिरमध्ये अनेक वर्षांपासून लागू असलेले 370 वे कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला - शिवेंद्रसिंहराजे
कलम 370 रद्द हीच शहिदांना श्रध्दांजली : शिवेंद्रसिंहराजे 

सातारा : ''पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज क्रांतीकारी निर्णय घेऊन जम्मू आणि काश्‍मिरमध्ये खऱ्या अर्थाने शांतता प्रस्तापित करण्यासाठी ठोस पाऊल उचलले आहे. येथे लागू असलेले कलम 370 रद्द करून घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयाचे मी सातारा जिल्हावासियांच्या वतीने स्वागत करतो. मोदी सरकारने हा निर्णय घेऊन सातारा जिल्ह्यातील शहिद जवानांना खऱ्या अर्थाने श्रध्दांजली अर्पण केली आहे,'' अशी भावनिक प्रतिक्रिया भाजपचे नेते माजी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे. 

या संदर्भात दिलेल्या प्रसिध्दी पत्रकात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी म्हटले.....सातारा जिल्हा हा शूरवीर जवानांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. जिल्ह्यातील हजारो युवक सैन्यदलात सेवा बजावत आहेत. तसेच असंख्य जवानांना देशाचे रक्षण करताना सीमेवर वीरमरण आले आहे. अनेक जवान अतिरेकी हल्ल्यांमध्ये शहिद झाले आहेत. जम्मू काश्‍मिर हाच दहशतवादाचा मुख्य मुद्दा असून आज मोदी सरकराने जम्मू आणि कश्‍मिरमध्ये अनेक वर्षांपासून लागू असलेले 370 वे कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे येथील वेगळी घटना आणि झेंडा संपुष्टात आणला. देशाची अखंडता अबाधित ठेवणारा निर्णय भाजपा सरकारने घेतला आहे. आता काश्‍मिर आणि लडाख हे दोन वेगळे केंद्रशासित प्रदेश झाले आहेत. नरेंद्र मोदी सरकारच्या या निर्णयाचा मला अभिमान आहे. या अभुतपूर्व निर्णयामुळे सातारा जिल्ह्यातील शहिद वीर जवानांना खऱ्या अर्थाने श्रध्दांजली अर्पण झाली आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com