shivendraraje birthday flex | Sarkarnama

आ. शिवेंद्रसिंहराजे समर्थकांचा अनोखा फतवा 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 22 मार्च 2017

वाढदिवसाच्या फ्लेक्‍सवर शिवेंद्रबाबा, बाबाराजे, बाबामहाराज असे न लिहिता त्याऐवजी शिवेंद्रसिंह महाराज साहेब असे लिहावे, असे सांगण्यात आले आहे. याफतव्याची खासदार उदयनराजे समर्थकांत मात्र मोठी चर्चा आहे. 

सातारा : साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा वाढदिवस 30 मार्चला आहे. या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या काही समर्थकांनी अनोखा फतवा काढला आहे. वाढदिवसाच्या फ्लेक्‍सवर शिवेंद्रबाबा, बाबाराजे, बाबामहाराज असे न लिहिता त्याऐवजी शिवेंद्रसिंह महाराज साहेब असे लिहावे, असे सांगण्यात आले आहे. याफतव्याची खासदार उदयनराजे समर्थकांत मात्र मोठी चर्चा आहे. 

शिवेंद्रसिंहराजेंना त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते कोणी बाबाराजे, कोणी शिवेंद्रबाबा, कोणी बाबा महाराज अशा नावाने ओळखतात. त्यामुळे वाढदिवसाच्या फ्लेक्‍सवर आमदार शिवेंद्रसिंहराजेंचे नाव वेगवेगळे येते. कला वाणिज्य महाविद्यालयाच्या सभागृहात आमदार समर्थकांची वाढदिवसाच्या नियोजनासाठी नुकतीच बैठक झाली. या बैठकीत
काही निष्ठावंत कार्यकर्त्यांनी हा मुद्दा मांडला. प्रत्येक फ्लेक्‍सवर आमदारांचे नाव एकसारखेच लिहावे, असे यावेळी सांगण्यात आले. पण हा अनोखा फतवा त्यांच्याच इतर कार्यकर्त्यांना रूचलेला नाही. पण आमदार समर्थकांच्या या फतव्याची खासदार उदयनराजे समर्थकांत मोठी चर्चा आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store


संबंधित लेख