माझा विजय म्हणजेच जनतेचा विजय : शिवेंद्रसिंहराजे

विकास कामे मार्गी लागावीत, तुमच्या गावाचा, भागाचा आणि संपूर्ण मतदारसंघाचा गतीने विकास व्हावा यासाठीच मी भाजपमध्ये गेलो आहे.
माझा विजय म्हणजेच जनतेचा विजय : शिवेंद्रसिंहराजे

सातारा : विरोधकांच्या भूलथापांना जनता भीक घालणार नाही. माझा विजय निश्चित असून हा जनतेचा विजय आहे, असे मत महायुतीचे सातारा- जावली विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केले. 

सातारा तालुक्यातील शेंद्रे गटातील आसनगाव येथे आयोजित प्रचारसभेत शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी अरविंद चव्हाण, बाजार समितीचे सभापती  विक्रम पवार, संचालक दत्तात्रय शिंदे, सूर्यकांत पडवळ, सूतगिरणीचे चेअरमन उत्तम नावडकर, सरपंच सौ.सुषमा गायकवाड, हणमंत गुरव,दिलीप यादव, संतोष कदम ,प्रदीप जाधव, विजय कदम, संतोष शेळके, पोपटराव धनवडे, राजू साळुंखे आदी उपस्थित होते.

शिवेंद्रराजे म्हणाले,  पाणीयोजना, रस्ते, सांस्कृतिक भवन, अंगणवाडी आदी सुविधा उपलब्ध करून प्रत्येक गावात विकासगंगा पोहचली आहे. आगामी काळात साताऱ्यात नवीन एमआयडीसी उभारणी तसेच मेगा प्रोजेक्ट आणून मतदारसंघातील युवकांना रोजगार उपलब्ध करून देणार आहे. स्थानिक विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षणासाठी मेडिकल कॉलेज लवकरच सुरु करणार आहे. लांब पल्ल्याचे असलेले रस्ते मुख्यमंत्री सडक योजनेतून मार्गी लावणार आहे. मतदारसंघाच्या विकासाचा दृष्टिकोन ठेवून मी भाजपमध्ये जाणे योग्य समजले आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com