आनेवाडी टोलनाका बंद करणार: शिवेंद्रसिंहराजे 

सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या महामार्गाची दुरवस्था झाल्याने लोक त्रस्त झाले आहेत. माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी याप्रश्नी आवाज उठवला आहे. आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी तर टोलनाका बंद करण्याची तारीख जाहीर केली आहे.
satara collector meeting on highway roads
satara collector meeting on highway roads

सातारा: महामार्गावर पुणे-सातारा दरम्यान झालेल्या दुरवस्थेबाबत निवेदन देऊन 15 दिवस झाले तरी खड्डे तसेच असल्याने भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी आज जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत आक्रमक भुमिका घेतली. 

येत्या 15 दिवसांत खड्डे भरून खराब रस्त्याचे कार्पेटींग केले जाईल तसेच सेवा रस्त्यांचीही दुरूस्ती केली जाईल, असा शब्द महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी दिला. पण दिलेल्या मुदतीत काम झाले नाही तर 16 व्या दिवशी आनेवाडी टोलनाका बंद आंदोलन केले जाईल, असा इशारा शिवेंद्रसिंहराजेंनी दिला.

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाची खड्डयांमुळे दयनीय अवस्था झाली असून या महामार्गाची दुरुस्ती करावी, अशी मागणी करत शिवेंद्रसिंहराजे यांनी टोलबंद आंदोलन करण्याचा इशारा 9 नोव्हेंबरला दिला होता. रस्ते आणि भूपृष्ठवहन खात्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन महामार्ग दुरुस्ती आणि आवश्‍यक सोयी- सुविधा पुरवण्याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर आज (मंगळवारी) जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. यावेळी शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह टोल विरोधी जनता समुहातील सर्व सदस्य, निवासी उपजिल्हाधिकारी सुनिल थोरवे, अतिरिक्त पोलिस अधीक्षक धीरज पाटील, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक श्री. चिटणीस, रिलायन्स कंपनीचे श्री. गांधी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले, आनेवाडी टोलनाका येथून 20 किलोमीटर परिघात येणाऱ्या सर्व गावातील वाहनचालकांना सवलत पास देणे बंधनकारक आहे. त्यामुळे या सर्व गावातील वाहनचालकांनी सवलत पास घेतले नसतील तर ते घ्यावेत. संबंधित अधिकाऱ्यांनी या लोकांना सवलत पास तातडीने द्यावेत. यामध्ये सुध्दा बोगसगिरी सुरू आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com