उदयनराजे चौकटीतील नेते नव्हेत!

राष्ट्रवादीत असताना शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना विरोध होता.
उदयनराजे चौकटीतील नेते नव्हेत!

सातारा : उदयनराजे हे माझे थोरले चुलत बंधू आहेत. ते कोठेही असोत त्यांची विधानसभा निवडणुकीत मला मदत होणारच आहे, असे यापूर्वीही मी सांगितले आहे आणि आजही सांगतो. कारण उदयनराजेंना कोणत्याही एका पक्षाच्या चौकटीत बांधता येणार नाही, असे मत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी 'सरकारनामा'शी बोलताना व्यक्त केले. 

खासदार उदयनराजे भोसले हे भाजपमध्ये प्रवेश करण्याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वीच शिवेंद्रसिंहराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीत असताना शिवेंद्रसिंहराजेंचा उदयनराजेंना विरोध होता. पण आता नवीन पक्षात त्यांचे हे विरोधाचे राजकारण पुढे सुरू राहणार का, याविषयी शिवेंद्रसिंहराजेंकडून जाणून घेतले.
 
ते म्हणाले, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष सोडताना मी कोणावरही आक्षेप अथवा आरोप केलेला नव्हता. केवळ माझा सातारा-जावळी मतदारसंघ आणि तेथील विकासकामे यांना प्राधान्य देताना सध्याची राजकिय परिस्थिती लक्षात घेऊन मी निर्णय घेतला. आता यापुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनखाली काम करणार आहे. कोणी कोणत्या पक्षात जावे हा निर्णय ज्याचा त्यांनी घ्यायचा असतो. उदयनराजे हे माझे थोरले चुलत बंधू आहेत. ते कुठेही असले तरी मला मदत करणार आहेत. तेही आता भाजपमध्ये जाणार असे समजत आहे. मी त्यांना लोकसभा निवडणुकीत मदत केली होती. त्यामुळे यावेळेस विधानसभेला ते मला नक्की मदत करतील.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com