Shivena Aditya Thakray Visited Farms in Nashik District | Sarkarnama

अतीवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाहणी दौऱ्यात आदित्य ठाकरेंनी तुडवला चिखल

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 4 नोव्हेंबर 2019

अतीवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीच्या पाहणीसाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी विविध गावांत चिखल तुडवत द्राक्षबागा आणि शीतीच पाहणी केली. झालेले नुकसान पाहून काही काळ ते सुध्दा भाऊक झाले होते. यावेळी ते शतकऱ्यांना म्हणाले, "नुकसान मोठे आहे. आम्ही त्यासाठी शेतकऱ्यांसोबत आहोत. यातून मार्ग काढू. मात्र, कोणताही वाईट विचार मनात आणू नका. केव्हाही हाक मारा, मी सदैव तुमच्यासोबत आहे"

नाशिक : अतीवृष्टीने नुकसान झालेल्या शेतीच्या पाहणीसाठी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी त्यांनी विविध गावांत चिखल तुडवत द्राक्षबागा आणि शीतीच पाहणी केली. झालेले नुकसान पाहून काही काळ ते सुध्दा भाऊक झाले होते. यावेळी ते शतकऱ्यांना म्हणाले, "नुकसान मोठे आहे. आम्ही त्यासाठी शेतकऱ्यांसोबत आहोत. यातून मार्ग काढू. मात्र, कोणताही वाईट विचार मनात आणू नका. केव्हाही हाक मारा, मी सदैव तुमच्यासोबत आहे"

आज सकाळी त्यांनी आपला दौरा सुरु केला. यावेळी शिवसेना गटनेते एकनाथ शिंदे त्यांच्यासमवेत होते. त्यांनी चांदवड, मालेगाव, निफाड तालुक्‍यांचा दौरा केला. शेतकऱ्यांच्या अडचणी समजुन घेतल्या. राज्यात सत्ता स्थापनेसाठी रस्सीखेच सुरु आहे. हा संदर्भ पकडून ते म्हणाले, "शिवसेना कुणासोबत आहे तर ती शेतकऱ्यांसोबत. अतीवृष्टीने झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांसाठी संकट मोठे आहे. ओला दुष्काळ जाहिर झाला पाहिजे. नुकसानीचे पंचनामे वेगाने केले पाहिजेत. सर्वांना मदत मिळाली पाहिजे. काही बरे वाईट करण्याचा विचार करू नका. मला हाक मारा. शिवसेना तुमच्यासाठी सदैव आहे. विमा कंपनी व अन्य कोणी शेतकरी बांधवांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास त्याची गाठ आमच्याशी असेल. नुकसान भरपाई कर्जमाफीसाठी कटीबध्द आहोत. केंद्राने भरीव मदत करायला हवी.'' यावेळी त्यांनी द्राक्षबागेतील गाळात अडकलेला ट्रॅक्‍टर काढण्यासाठी संबंधीत शेतकऱ्याला आर्थिक मदत दिली.

वडनेर भैरव-येथे द्राक्षबागेच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. यावेळी जवळ जवळ सर्वच शेतकऱ्यांनी आपल्या अडचणी सांगतांना शेतकऱ्यांना वाचवायचं असेल तर संपूर्ण कर्जमाफी हाच खरा पर्याय आहे, असे सांगितले. ठाकरे यांनी सगळ्यांच्या तक्रारी ऐकुन घेतल्या. यावेळी राज्यमंत्री दादा भुसे, शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, आमदार नरेंद्र दराडे, आमदार सुहास कांदे, माजी आमदार अनिल कदम आदी उपस्थित होते.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख