नागपुरात वाढणार शिवभोजन केंद्रांची संख्या

या योजनेअंतर्गत दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक वाटी वरण, भात समाविष्ट असलेली जेवणाची थाळी दहा रुपये प्रतिथाळी याप्रमाणे उपलब्ध आहे.
shivbhojan centres are increased in nagpur city 
shivbhojan centres are increased in nagpur city 

नागपूर : शिवभोजन योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहता योजनेच्या केंद्रांच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. नागपूर शहरात नवीन ठिकाणे निश्‍चित करण्याठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच बैठक होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे शहरात लवकरच शिवभोजन केंद्रांची संख्या वाढणार आहे.

राज्यातील गरीब व गरजू जनतेला सवलतीच्या दरात भोजन उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना 26 जानेवारीपासून शहरातील 10 ठिकाणी सुरू करण्यात आली. शिवभोजन योजनेअंतर्गत राज्यात स्वस्त दरात शासकीय अनुदान प्राप्त भोजनालयातून भोजन उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेअंतर्गत दोन चपात्या, एक वाटी भाजी, एक वाटी वरण, भात समाविष्ट असलेली जेवणाची थाळी दहा रुपये प्रतिथाळी याप्रमाणे उपलब्ध आहे. शहरातील डागा रुग्णालय, गणेशपेठ बसस्थानक, गणेश भोजनालय बसस्थानक, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज कॅन्सर हॉस्पिटल येथे दोन ठिकाणी, कळमना कृषी उत्पन्न बाजार समिती येथे दोन ठिकाणी, मातृसेवा संघ हॉस्पिटल येथे दोन ठिकाणी केंद्र सुरू करण्यात आले आहेत.

दररोज जवळपास 750 लोकांनाच या थाळीचा लाभ घेता येत होता. या ठिकाणी दिलेले उद्दिष्टही पूर्ण होते. 19 फेब्रुवारीपासून या ठिकाणी 25 थाळी प्रत्येक ठिकाणी वाढवून देण्यात आली आहे. हे ही उद्दिष्ट पूर्ण केल्यामुळे व शहरातील मागणी लक्षात घेता शासकीय रुग्णालय, रेल्वेस्थानकासह इतर ठिकाणी नवीन केंद्रे सुरू करण्याचे नियोजन आहे. याबाबत प्राप्त प्रस्तावांचा विचार करून लवकरच ठिकाणे निश्‍चित करण्यात येतील. त्यानुसार नवीन शिवभोजन केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याचे शहर पुरवठा अधिकारी भास्कर तायडे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com