शिवार सभांमुळे रंगली कर्जमाफीची चर्चा ! 

भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे हे काही महिन्यांपुर्वी भाजपचे सहयोगी सदस्य झाले आहेत. ते सातारा जिल्ह्यात सभा घेत आहेत. मुख्यत: वाई तालुक्‍यात त्यांनी यासंबंधीच्या बैठका घेतल्या असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.
 शिवार सभांमुळे रंगली कर्जमाफीची चर्चा ! 
शिवार सभांमुळे रंगली कर्जमाफीची चर्चा ! 

सातारा : जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघनिहाय शिवार संवाद सभांनी वेग घेतला आहे. या सभांमुळे शेतकऱ्यांत कर्जमाफीची चर्चा रंगली आहे. 

विरोधकांकडून "शेतकरी विरोधी सरकार' म्हणून होणाऱ्या टिकेला उत्तर देऊन शेतकऱ्यांच्या मनात भाजप सरकारविषयी आपुलकीची भावना निर्माण होण्यासाठी शिवार संवाद सभांच्या माध्यमातून वातावरण निर्मिती केली जात आहे. याचाच भाग म्हणून सातारा जिल्ह्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात शिवार संवाद सभा सुरू आहेत. त्यासाठी प्रत्येक भाजपच्या आमदारांवर एका एका मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार पुण्याचे पालकमंत्री गिरिश बापट यांच्यासह आमदार महेश लांडगे, मेधा कुलकर्णी, योगेश सागर, माधुरी मिसाळ हे आमदार प्रत्येक मतदारसंघातील पाच गावात जाऊन सभांच्या माध्यमातून शेतकऱ्यांत "श्‍वाश्‍वत शेती, समृध्द शेतकरी' ही भुमिका रूजवत आहेत. 

या सभांमधून केंद्र व राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी घेतलेल्या महत्वपूर्ण निर्णयांची माहिती तसेच कर्जमाफी देण्याविषयीची सरकारची भुमिका मांडली जात आहे. हे सरकार शेतकऱ्यांचे सरकार असल्याचे शेतकऱ्यांच्या मनावर बिंबवले जात आहे. कर्जमाफी देण्यापूर्वी त्याचा अभ्यास करून मगच निर्णय घेतला जाणार असल्याचे सांगितले जात आहे. त्यांचा अभ्यास कधी संपणार आणि त्या अभ्यासातून कर्जमाफीचा निर्णय होणार का, हा प्रश्‍न मात्र, अनुत्तरीत आहे. पण शिवार संवाद सभांच्या निमित्ताने का होईना कर्जमाफीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com