खासदार जयसिद्धेश्वर महास्वामींनी समाजाची माफी मागावी आणि मठात बसावे!

लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी या मुद्द्यावर जयसिद्धेश्वर प्रतिकूल आहेत.त्यांचे वागणे बसवण्णाच्या विरोधात आहे.
shivanand  haibatpure criticize jaisidhheshway swammy and demand his apology
shivanand  haibatpure criticize jaisidhheshway swammy and demand his apology

पुणे : सोलापूरचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी ज्या पद्धतीने खासदार झाले, तो त्यांनी संविधानाशी केलेला द्रोह आहे. त्यांनी लिंगायत धर्माचाही अपमान केला आहे. त्यांची कागदपत्रे बोगस होती हे त्यांना माहिती होते तरीही त्यांनी निवडणूक का लढवली ?, असा सवाल आखिल भारतीय बसव परिषदेचे अध्यक्ष शिवानंद हैबतपुरे यांनी केला आहे.

खासदार जयसिद्धेश्वर यांचा जातीच्या दाखला बनावट ठरल्यामुळे ते अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी होत आहे. त्यांच्यावर हैबतपुरे यांनी जोरदार टीका करत त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी केली.

म्हणाले,"सोलापुरात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा पराभव व्हावा म्हणून प्रस्थापितांनी मोठे षडयंत्र रचले. स्वामी जयसिद्धेश्वर हा त्याच षडयंत्राचा भाग आहे. सोलापूरची निवडणूक जातीयवादाच्या उंबरठ्यावर नेवून ठेवण्यात आली. आंबेडकर यांच्यासारख्या बुद्धिमान नेत्याला संसदेपासून वंचित राहावं लागलं. जयसिद्धेश्वर स्वामी यांना स्वतःची कागदपत्रे बोगस आहेत हे माहिती असूनही त्यांनी निवडणूक लढवली. ज्यावेळेस कागदपत्रे दाखवण्याची वेळ आली तेव्हा मात्र ते कागदपत्र प्रवासात हरवली आहेत असं ते सांगत आहेत. म्हणजेच या चोराच्या उलट्या बोंबा आहेत. " असं हैबतपुरे यांनी म्हटलं आहे.

"लिंगायत हा स्वतंत्र धर्म आहे. त्या संदर्भात जे राष्ट्रीव्यापी आंदोलन उभा राहिले. त्यात जयसिद्धेश्वर स्वामी कुठेही दिसले नाहीत. मात्र त्यांनी लिंगायतांच्या नावावर मतांची झोळी मात्र भरली. हा माणूस लिंगायत धर्माच्या विरोधातील आहे. बसवविरोधी आहे. त्यांनी समाजाची माफी मागावी आणि मठात बसावे," असे हैबतपुरे म्हणाले.  

"लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता मिळावी या मुद्द्यावर जयसिद्धेश्वर प्रतिकूल आहेत.त्यांचे वागणे बसवण्णाच्या विरोधात आहे.जातीच्या मुद्यावरून त्यांनी सगळ्यांची दिशाभूल केली आहे. त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे.सरकारने त्यांना पाठीशी घालू नये."अशी मागणी हैबतपुरे यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com