शिवाजीराव गर्जे आणि अदिती नलावडे राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर - shivajirao garje and aditi nalawade governor nominated member in council | Politics Marathi News - Sarkarnama

शिवाजीराव गर्जे आणि अदिती नलावडे राष्ट्रवादीकडून विधान परिषदेवर

राजू सोनवणे
गुरुवार, 19 डिसेंबर 2019

नागपूर : राष्ट्रवादी काॅंग्रेसने संघटनेत काम करणाऱ्यांना पदावर स्थान द्यायचे ठरविलेले धोरण अमलात आणले असून प्रदेश सरचिटणीस म्हणून गेली काही वर्षे जबाबदारी सांभाळणारे शिवाजीराव गर्जे आणि युवती राष्ट्रवादीच्या मुंबईच्या अध्यक्षा अदिती नलावडे यांना विधान परिषदेवर संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. हे दोघेही तातडीने उद्याच आमदारकीची शपथ घेणार आहेत.

राष्ट्रवादीकडून सहा वर्षांपूर्वी राज्यपाल नियुक्त सदस्य विधान परिषदेवर घेण्यात आले होते. त्यातील राहुल नार्वेकर यांनी पदाचा राजीनामा देऊन शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढविली. ते निवडूनही आले. दुसरे राम वडकुते यांनी पक्षावर नाराज होत आमदाकीचा राजीनामा दिला होता. विधान परिषदेच्या या दोन जागा रिक्त झाल्याने राष्ट्रवादीने तातडीने आपले दोन नवीन चेहरे विधान परिषदेवर देण्याचा निर्णय घेतला

अदिती या विधानसभेचे माजी अध्यक्ष व शिवसेनेचे नेते दत्ताजी नलावडे यांच्या पुतणी आहेत. वरळीमधून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक लढविण्यासाठी त्यांच्या नावाची चर्चा होती. आक्रमक कार्यकर्त्या म्हणून त्यांचा परिचय आहे. गर्जे हे राष्ट्रवादीच्या कार्यालयातील सर्व कामकाज पाहतात.

राष्ट्रवादी काॅंग्रेस पहिल्या टप्प्यात अमोल मेटकरी यांना संधी देईल, अशी चर्चा होती. मात्र त्यांच्याऐवजी या दोघांनी संधी मिळाली आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख