ऱाष्ट्रवादीला पुढील वीस वर्षे हल्ला बोल आंदोलनच करावे लागेल : खासदार आढळराव पाटील

ऱाष्ट्रवादीला पुढील वीस वर्षे हल्ला बोल आंदोलनच करावे लागेल : खासदार आढळराव पाटील

नारायणगाव : राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्षाच्या नेत्यांनी सत्तेची दिवास्वप्ने पाहू नयेत. किमान पुढील वीस वर्षे राज्यात राष्ट्रवादी व कॉंग्रेसची सत्ता येणार नाही. यामुळे त्यांना पुढील वीस वर्ष हाल्लाबोल आंदोलने करावी लागतील, अशी टीका खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी नारायणगाव येथील कार्यक्रमात केली.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत येथील जुन्या पुणे नाशिक महामार्गाच्या 5.37 किलोमीटर लांबीच्या रस्त्यासाठी खासदार आढळराव पाटील यांच्या प्रयत्नामुळे 22 कोटी 94 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.या कामाचे भूमिपूजन खासदार आढळराव पाटील यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच योगेश पाटे होते.

खासदार आढळराव पाटील म्हणाले की माझी बांधीलकी जनतेशी आहे.शिरूर लोकसभा मतदार संघात मी कोट्यवधी रुपयांची विकास कामे केली आहेत.विरोधक सोशल मिडियाच्या माध्यमातून माझ्या विरोधात खोटा अपप्रचार करत आहेत. खेड ते सिन्नर रस्त्याचे रुंदीकरण(1 हजार 600 कोटी रुपये),पुणे ते नाशिक रेल्वे प्रकल्प(7 हजार 500 कोटी रु.),भीमाशंकर विकास आराखडा(148 कोटी रु.),अष्टविनायक रिंग रोड(400 कोटी रु.) आदि विकास कामांना मी मंजुरी आणली आहे. प्रशासकीय दिरंगाईमुळे बाह्यवळण रस्त्याच्या भूसंपादनाला उशीर झाला.या मुळे ठेकेदार तोट्यात गेल्याने सध्या खेड ते नारायणगाव दरम्यानच्या महामार्गावरील पाच बाह्यवळणाची कामे थांबली आहेत.दुसऱ्या ठेकेदारा मार्फत येत्या दोन महिन्यात हे काम सुरू होईल.

पुणे ते नाशिक दरम्यानचे अंतर दोन तासात पूर्ण करण्यासाठी हा रेल्वे प्रकल्प हायस्पीड असणार आहे.पुणे नाशिक महामार्गावर दहा वर्षापूर्वी रोज पंचवीस हजार वाहनांची वाहतूक होती. सध्या 75 हजार वाहनांची वाहतूक होत आहे.वाढलेली वाहने व अतिक्रमणे या मुळे वाहतूक कोंडिचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.वाहतूक कोंडीतून दिलासा देण्यासाठी नारायणगाव व खेड शहरी भागातील 9 .13 किलोमीटर लांबीच्या महामार्गाच्या रुंदीकरणासाठी 38 कोटी 93 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.हे काम तातडीने पूर्ण करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com