Shivajirao Adhalrao criticizes Dilip Walse Patil | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

मराठा समाजाला भाजपा-शिवसेनेने आरक्षण दिल्याने वळसेंना पोटदुखी : आढळराव

भरत पचंगे 
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

.

शिक्रापूर : "मराठा आरक्षणाबाबत विधानसभेत माजी विधानसभाध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केलेल्या नकारात्मक विधानांचा मी  जाहीर  निषेध करतो .  मराठा समाजाला   आरक्षण भाजपा-शिवसेनेने दिल्याने वळसे-पाटलांना पोटदुखी सुरू झाली आहे ",अशी  प्रतिक्रिया  खासदार शिवाजीराव आढळराव यांनी  दिली. 

खासदार  शिवाजीराव आढळराव म्हणाले,"गुरुवारी  जाहीर  झालेल्या मराठा आरक्षणाबाबत भाजपा-शिवसेनेने ज्या पध्दतीने युती म्हणून कामगिरी केली ती, दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि स्व.प्रमोद महाजन यांच्या मैत्रीमुळे ! सन १९९५ ची युतीच्या सत्तेची आठवण झाली आहे. गेल्या दोन वर्षांपासून मराठा आरक्षणाच्या बाबतीत प्रत्येक स्तरावत दिमाखदार कामगिरी करणा-या भाजपा-शिवसेना युतीच्या सर्व नेते-मंत्री आणि पदाधिका-यांच्या अथक प्रयत्नामुळेच हा ऐतिहासिक तमाम मराठा जनांच्या हिताचा आणि उज्वल भविष्याचा निर्णय झाला आहे ."
 
 "मराठाच नाही तर धनगर, मुस्लिम, लिंगायत आणि इतर सर्वच धर्मियांना आताशी कुठे शिवसेना- भाजप युती आणि कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कारभारातीळ फरक कळायला लागला  आहे. केवळ राजकारणासाठी प्रत्येक समाजाला तब्बल साठ वर्षे झुलवत ठेवणा-या कॉंग्रेस-राष्ट्रवादीला आणि त्यांच्या सर्व नेत्यांना आजचा निर्णय ही चपराक आहे ." 

" दरम्यान एकीकडे संपूर्ण राज्य, भाजपा-शिवसेना, सर्व विरोधी पक्ष यांचा आरक्षणासाठी जाहिर पाठींबा असताना सभागृहातील आजच्या चर्चेत आरक्षणाबाबत नकारात्मक बोलणारे राष्ट्रवादीचे जेष्ठ आमदार दिलीप वळसे पाटील हे ’खंडीच्या वरणात.....’  नेते असल्याची टिकाही आढळराव यांनी केली असून त्यांच्या या वक्तव्याचा आपण, आपल पक्ष, तमाम मराठा समाज बांधव यांचेकडून जाहिर निषेध करतो,"असेही श्री आढळराव यांनी सांगितले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख