खासदार बापट हे शकुनीमामा; त्यांनीच शिवसेनेचे उमेदवार पाडले!   

माजी आमदार गोरे यांनी त्यांच्या भाषणात माजी खासदार शिवाजीदादांनी आता पालकमंत्री झाले पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करू. जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवायची असेल, पक्षसंघटना बळकट करायची असेल तर आढळराव पाटील यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री झाले पाहिजे असे सांगितले.
खासदार बापट हे शकुनीमामा; त्यांनीच शिवसेनेचे उमेदवार पाडले!   

चाकण (पुणे): जिल्ह्यात शिवसेनेचे उमेदवार पडण्यामागे खासदार गिरीश बापट कारणीभूत आहेत. ते शकूनीमामा आहेत. मित्र पक्षाने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. आम्ही केलेल्या कामांचे श्रेय देखील त्यांनी आम्हाला मिळू दिले नाही. आमदार गोरे यांचा पराभव होण्यामागे बापट हे शकुनीमामा आहेत. बापटांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना फोन करून बंडखोर उमेदवाराचे काम करा असे सांगितले, असा आरोप माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यात केला. 

खेड तालुका शिवसेनेच्या वतीने भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना आढळराव पाटील म्हणाले, "खेड तालुक्‍यातील निष्क्रिय कार्यकर्त्यांना घरी बसविले पाहिजे. नव्या नियुक्‍त्या केल्या पाहिजेत. कार्यकर्ते नुसते पद घेतात आणि त्यांच्या गावात मतदान विरोधी उमेदवाराला अधिक होते. खेडच्या पश्‍चिम डोंगराळ भागात माजी आमदार सुरेश गोरे यांना विकासकामे करूनही कमी मते पडली. खेड तालुक्‍यात पक्ष संघटना बळकट होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.'' 

यावेळी माजी आमदार सुरेश गोरे म्हणाले, "मी मला भाई म्हणा असे का म्हणालो, तर ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्यासाठी मी यापुढे भाई होणार आहे. जे अन्याय करतात, तालुक्‍यात दादागिरी करतात त्यांना त्यांची जागा दाखविणार आहे.'' यावेळी माऊली कटके, रामदास धनवटे, अशोक खांडेभराड, विजया शिंदे, राजेश जवळेकर, किरण मांजरे आदी उपस्थित होते. 

 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com