शिवाजी कर्डिले शंका कुशंकांना पुरून उरले!

पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज लगेचच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
शिवाजी कर्डिले शंका कुशंकांना पुरून उरले!

नगर : भारतीय जनता पक्षाने आज नगर जिल्ह्यातील आठ जागांची उमेदवारी जाहीर केली असून, विद्यमान आमदार असलेल्या सर्वांना पुन्हा उमेदवारी दिली आहे 

अकोले विधानसभा मतदारसंघात नव्याने भाजपमध्ये दाखल झालेल्या वैभव पिचड यांची, तसेच शिर्डी विधानसभा मतदारसंघातूनही नव्याने भाजपमध्ये गेलेले गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची उमेदवारी निश्चित होती. इतर मतदारसंघात मात्र अनिश्चितता होती. त्यामुळे इतर आमदारांची धाकधुकी वाढली होती. श्रीगोंदे विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आमदार राहुल जगताप यांच्या भाजपप्रवेशाच्या वावड्या उठल्या जात होत्या. मात्र तेथे पाचपुते यांनाच अखेर पक्षाने संधी दिली. शेवगाव-पाथर्डी विधानसभा मतदारसंघात आमदार राजळे यांच्याविरोधात पक्षांतर्गत दोन गट करण्यात विरोधक यशस्वी झाले होते, मात्र पक्षश्रेष्ठींनी आमदार राजळे यांच्याच नावावर शिक्कामोर्तब केले. 

नेवासे मतदारसंघातूनही आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या नावाबाबत चर्चा सुरू होती. अपेक्षेप्रमाणे मुरकुटे यांनाच उमेदवारी मिळाली. कोपरगावमध्ये मात्र आमदार स्नेहलता कोल्हे यांचीच उमेदवारी निश्चित मानली जात होती. राहुरी मतदारसंघाचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्याही उमेदवारीबाबत शंका उपस्थित झाल्या होत्या. लोकसभेला खासदार सुजय विखे पाटील यांना मदत केली की नाही, याबाबत विविध मत मांडले जात होते. मात्र श्रेष्ठींचे मन जिंकण्यात कर्डिले यशस्वी झाले. कर्जत-जामखेडमध्येही राम शिंदे यांची उमेदवारी निश्चित होती. आता उमेदवारी जाहीर झाल्या असल्याने प्रचाराला वेग येणार आहे. पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी आज लगेचच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

भाजपचे उमेदवार असे :
अकोले : वैभव पिचड
शिर्डी : राधाकृष्ण विखे पाटील
कोपरगाव : स्नेहलता कोल्हे
राहुरी : शिवाजी कर्डिले
शेवगाव-पाथर्डी : मोनिका राजळे
श्रीगोंदे : बबनराव पाचपुते
कर्जत-जामखेड : राम शिंदे
नेवासे : बाळासाहेब मुरकुटे
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com