Shivaji Kardile and Vikhe Patil Nagar News | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

विखे पाटलांचं घर फोडायला निघाले आमदार कर्डिले.....?

मुरलीधर कराळे
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

स्वतःच्या अडचणीवर राजकीय खेळी करून बाहेर पडणार नसतील, तर ते आमदार कर्डिले कसले! संकट कोणतेही असो, मोठ्या खुबीने त्यांनी आतापर्यंत त्यावर मात करीत गेले तीन दशके त्यांनी आपली आमदारकी टिकवून ठेवली आहे. आताही त्यांच्यापुढे मोठी अडचण आहे. एकीकडे राहुरी विधानसभा मतदारसंघातून आमदारकी टिकविण्यास मदत करणारे काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डाॅ. सुजय विखे पाटील आहेत, तर दुसरीकडे सख्खे नातेसंबंध असलेले व्याही राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप आहेत. 

नगर : युवक काँग्रेसचे नेते डाॅ. सुजय विखे पाटील यांना भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांनी थेट जाहीर आवाहन करीत 'उत्तरेतील रहिवास सोडून दक्षिणेत विळद घाटात बंगला बांधा म्हणजे दक्षिणेचे व्हाल, वडिलांना राहू द्या काँग्रेसमध्ये, तुम्ही भाजपमध्ये या,' असा सल्ला दिला खरा. पण त्यानिमित्ताने विखे पाटलांचे घर फोडायला कर्डिले निघाले की काय, अशी मिश्किल टिपण्णी राजकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

स्वतःच्या अडचणीवर राजकीय खेळी करून बाहेर पडणार नसतील, तर ते आमदार कर्डिले कसले! संकट कोणतेही असो, मोठ्या खुबीने त्यांनी आतापर्यंत त्यावर मात करीत गेले तीन दशके त्यांनी आपली आमदारकी टिकवून ठेवली आहे. आताही त्यांच्यापुढे मोठी अडचण आहे. एकीकडे राहुरी विधानसभा मतदारसंघातून आमदारकी टिकविण्यास मदत करणारे काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव डाॅ. सुजय विखे पाटील आहेत, तर दुसरीकडे सख्खे नातेसंबंध असलेले व्याही राष्ट्रवादीचे आमदार अरुण जगताप आहेत. 

खरोखरच दोन्ही उमेदवार लोकसभेला उभे राहिल्यास भाजपचे आमदार कर्डिले मदत कोणाला करणार, हा मोठा प्रश्न आहे. विशेष म्हणजे कर्डिले यांच्या भुमिकेवरच दक्षिणेतील उमेदवाराचेही भवितव्य अवलंबून आहे, हेही सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे या राजकीय चक्रव्युहातून कर्डिले सुखरूप कसे बाहेर पडणार, हे काळच ठरविणार आहे.

श्रीगोंदे येथील कुकडी साखर कारखान्याच्या कायक्रमात बोलताना कर्डिले यांनी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर थेट टीका करून आपण आमदार अरुण जगताप यांना लोकसभेचे तिकिट मिळाल्यास भाजप पक्ष बाजूला ठेवून मदत करू, असे ठासून सांगितले होते. दुसरीकडे डाॅ. राधाकृष्ण विखे यांनाही याच मतदारसंघातून मदत करू, असे ते सांगत आहेत. एकाच मतदारसंघात परस्पर विरोधी लढणाऱ्या दोघांना कर्डिले मदत कशी करणार, हा मोठा प्रश्न आहे. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास कर्डिले नेमका कोणती भूमिका घेतील? आमदारकी टिकवतील, की नातेसंबंध? याबाबत खलबते सुरू आहेत. पण त्यावरही मात करून राजकीय खेळी करीत ते सहीसलामत सुटतील, असाही जाणकारांचा अंदाज आहे.

कर्डिले यांनी आज राहुरी तालुक्यात झालेल्या कार्यक्रमात मोठी गुगली टाकली. डाॅ. सुजय विखे यांनी वडिलांना (राधाकृष्ण विखे पाटील) काँग्रेसमधेच ठेवून स्वतः भाजपमध्ये यावे, असे आवाहन केले. म्हणजेच वडिलांपासून स्वतंत्र रहा, पक्षही बदला असाच त्याचा अर्थ निघतो. त्यामुळेच कर्डिले हे विखे पाटलांचे घर फोडायला निघाले की काय, अशी मिस्किल चर्चा राजकीय वर्तुळात केली जात आहे.

सरकारनामा दिवाळी अंक - 2019 वर मोहोर कुणाची? वाचण्यासाठी आजच मागणी नोंदवा - या लिंकवर क्लिक करा
अधिक माहितीसाठी
व्हॉट्सअॅप : 91300 88459
फोन : 9881598815

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख