शिवाजी जाधव यांनी मागणी करताच फडणवीसांनी केली पूर्णा नदीवर तीन  बंधाऱ्यांची घोषणा 

.
CM-In-Jawlabajar.
CM-In-Jawlabajar.

जवळा बाजार, ( जि. हिंगोली) : भाजप नेते  शिवाजी जाधव यांनी विविध मागण्या मांडल्‍या. याबाबत मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी जवळा बाजार येथे १३२ केव्‍ही उपकेंद्र मंजूर केल्‍याची घोषणा केली. तर पूर्णा नदीवर तीन बंधारे बांधून देण्याचे आश्वासन यावेळी दिले.

येथील बाजार समितीच्‍या मैदानावर आयोजित महा जनादेश यात्रा जाहिर सभेत ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री अतुल सावे, भाजप नेते सुजीतसिंग ठाकूर, आमदार तान्‍हाजी मुटकुळे, भाजप नेते  शिवाजी जाधव, चंद्रकांत दळवी, नाथराव कदम, बालाजी जाधव, मिलिंद यंबल, डॉ. अवधुत शिंदे, विलास रायवाडे, शिवहार नरवाडे, अनिल वाघमारे, किशन देवरे, खोब्राजी नरवाडे, जितू महाजन, शंकरभाई कऱ्हाळे, बालाजी देसाई, सतीश सोमाणी, रावसाहेब अंभोरे, राजू आहेर, बळवंत चव्‍हाण, नागनाथ राखे, अक्षय भोसले यांच्‍यासह मान्यवरांची उपस्‍थिती होती.   

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या मार्गदर्शनाखाली मजबूत महाराष्ट्र घडवण्यासाठी जनतेने युतीला साथ द्यावी असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी (ता.३०) येथे केले.

यावेळी बोलताना श्री. फडणवीस म्‍हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३७० कलम रद्द करून जम्‍मू काश्मीर लढा तिरंगा झेंडा फडकवला. त्‍या भागात बेरोजगारांना पन्नास हजार नोकऱ्या उपलब्‍ध करून दिल्‍या आहेत. पंतप्रधान श्री. मोदी यांच्‍या नेतृत्‍वाखाली बलशाली भारत तयार होत असून आता शेजारील देशांची भारताकडे वाकडी नजर टाकून पाहण्याची हिंमत होणार नाही.

महाराष्ट्रात युती सरकारने पाच वर्षात कोट्यवधी रुपयांची विकासकामे केली आहेत. दुष्काळात अडकलेल्‍या शेतकऱ्यांना पाच वर्षात पन्नास हजार कोटी रुपयांची मदत केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्‍मान योजनेत पात्र शेतकऱ्यांना दिली जाणारी पीककर्ज माफी योजना अद्यापही सुरुच आहे. अखेरच्‍या पात्र शेतकऱ्यांपर्यंत या योजनेचा लाभ दिला जाईल असे त्‍यांनी सांगितले.

दुष्काळ, बोंडअळी, कर्जमाफी, पीकविमा, विविध अनुदान आदींच्या माध्यमातून मोठी मदत शेतकऱ्यांना दिली जात आहे. मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी सुद्धा वेगाने पावले टाकली जात आहेत, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले . 


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com