गोयलांच्या पुस्तकांचे प्रकाशन भाजपाच्या कार्यालयात कसे करण्यात आले ? थोरातांचा सवाल 

गोयलांच्या पुस्तकांचे प्रकाशन भाजपाच्या कार्यालयात कसे करण्यात आले ? थोरातांचा सवाल 

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करणे हा तर पंतप्रधान मोदी यांचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न आहे, या पुस्तकाशी जर भाजपाचा संबंध नव्हता तर या पुस्तकाचे प्रकाशन भाजपाच्या दिल्ली कार्यालयात कसे करण्यात आले असा संतप्त सवाल सवाल महसूल मंत्री तसेच कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आज येथे केला. 

या प्रकरणात भारतीय जनता पार्टीला हात झटकून जबाबदारीतून मुक्त होता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. 

"आज के शिवाजी नरेंद्र मोदी' या पुस्तकाचे प्रकाशन झाल्यानंतर या पुस्तकावरून सध्या गोंधळ सुरू आहे. या संदर्भात माध्यमांशी बोलताना थोरात यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका केली. 

ते म्हणाले "" या पुस्तकाशी जर भाजपाचा संबंध नव्हता तर या पुस्तकाचे प्रकाशन भाजपाच्या दिल्ली कार्यालयात कसे करण्यात आले. या साऱ्या प्रकरणात भाजपा सारवासारव करण्याचा प्रयत्न करीत असली तरी त्यांचीच खरी जबाबदारी आहे. 

या पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमानंतर कालपासून देशभर विशेषत: महाराष्ट्रात विरोधाचे वातावरण सुरू आहे. केंद्र सरकारने आणि भारतीय जनता पार्टीने या विरोधाची दखल घेण्याची गरज आहे.''

सुधारीत नागरीकत्व कायद्याबाबत शाळांमधून जागृती करण्याची भूमिका चुकीची आहे. सर्वच पातळ्यांवर केंद्र सरकार टोकाची भूमिका घेत आहे. परिणामी समाजात फूट पाडण्याचेच काम होत आहे., असे थोरात यांनी स्पष्ट केले. राज्यात आम्ही तीन पक्ष मिळून सरकार चालवत आहोत. त्यामुळे काही मतभेद असले तरी चर्चेतून मार्ग काढू, असे त्यांनी स्पष्ट केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com