Shiv sena wins without kingmaker | Sarkarnama

'किंग मेकर' शिवाय मुंबईत सेनेचा महापौर: निवडणुकीला मनसेची दांडी,भाजपने दिली सेनेला थेट साथ

कुणाल जाधव : सकाळ न्यूज़ नेटवर्क
बुधवार, 8 मार्च 2017

 महाराष्ट्र    नवनिर्माण सेनेने ( मनसे)  मुंबईत महापौर बनविन्यासाठी आपली भूमिका ' किंग मेकर' ची ठरेल, असा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात भाजपने घेतलेल्या माघारीमुळे किंग मेकरचा मनसेचा शो फ्लॉप झाला.

मुंबई, ता. 8 : मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जनतेने शिवसेना आणि भाजपला भरभरुन मते देऊनही कोणालाच स्पष्ठ बहुमत मिळाले नाही. या दोन पक्षांमधील वादाचा फायदा घेत अवघ्या 7 जागांवर विजयी झालेल्या महाराष्ट्र    नवनिर्माण सेनेने ( मनसे)  मुंबईत महापौर बनविन्यासाठी आपली भूमिका ' किंग मेकर' ची ठरेल, असा दावा केला होता. मात्र, प्रत्यक्षात भाजपने घेतलेल्या माघारीमुळे किंग मेकरचा मनसेचा शो फ्लॉप झाला. 

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत 84 जागांवर विजयी झालेल्या शिवसेनेपुढे 82 नगरसेवक निवडून आलेल्या भाजपने मोठे आव्हान उभे केले. त्यामुळे महापौर पदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता होती. पण इतर पक्षाचा पाठिंबा मिळविण्यात आणि नगरसेवक फोडण्यात अपयशी ठरलेल्या भाजपने शिवसेनेसमोर अखेर नांगी टाकली. आज ( 8 मार्च) झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत भाजपच्या 82 आणि एक भाजप पुरस्कृत अशा एकूण 83 नगरसेवकांनी शिवसेनेचे उमेदवार विश्वनाथ महाड़ेश्वर यांना महापौर पदासाठी मत दिले.

त्यामुळे शिवसेनेची 86 आणि भाजपचे 83 अशी एकूण 171 मते मिळवून महाड़ेश्वर महापौर पदावर विराजमान झाले. तसेच सेनेच्या हेमांगी वरळीकर यांचाही उपमहापौर बनण्याचा मार्ग सुकर झाला. या मतदान प्रक्रियेला मनसेचे सर्व नगरसेवक अनुपस्थित राहिले. एमआयएम पक्षाचाही एक नगरसेवक अनुपस्थित राहिला. मात्र, मनसेच्या गैरहजेरीनंतरही शिवसेनेला सहजपणे आपला महापौर निवडून आणता आला. यामुळे किंग मेकर बनण्याचे मनसेचे स्वप्न भंगले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख