Shiv Sena MLAs aggressive in assembly | Sarkarnama

विधानसभेत शिवसेनेचे आमदार अक्रमक

ब्रह्मदेव चट्टे: सरकारनामा  ब्युरो 
गुरुवार, 9 मार्च 2017

आजच्या सेना आमदारांच्या घोषणाबाजीवेळी सेनेचे मंत्री आमदारांना मार्गदर्श करताना दिसून येत होते.

मुंबई:विधानसभेत आज चौथ्या दिवसाचे कामकाज सुरू होताच कालप्रमाणेच कर्जमाफीची मागणी विरोधकांकडून जोरात करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे आमदार आक्रमकपणे विरोधकांच्या मागणीत सहभागी होत कर्जमाफीची मागणी करत होते.

शिवसेनेच्या आमदारांनी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झालाच पाहिजे अशी मागणी करणारे फलक असलेले बँनेर परिधान केले होते. त्यामुळे शिवसेनेचे आमदार सगळ्यांचे लक्षवेधून घेत होते.

विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधकांसह सेना आमदारांनी कर्जमाफीची घोषणा लावून धरली. यामुळे पहिल्या 15 मिनीटांसाठी, त्यानंतर विधानसभा 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली. त्यानंतर काजकाज पुन्हा सुरू झाले. त्यावेळी विरोधकासह सेने आमदारही वेलमध्ये उतरले होते. सेनेचे आमदार विरोधकांना साथ देत भाजपला इशारा देत होते. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी कामकाज अर्धा तास स्थगित केले.

शिवसेनेच्या आमदारांनी घोषणाबाजी करताना भाजपला इशारा दिला आहे.शिवसेनेचे आमदारांनी मंत्री काम करत नसल्याच्या तक्रारी केल्याच्या बातम्या प्रसिध्द झाल्यानंतर मंत्रीही अस्वस्थ झाले आहेत.

आजच्या सेना आमदारांच्या घोषणाबाजीवेळी सेनेचे मंत्री आमदारांना मार्गदर्श करताना दिसून येत होते. काल मुंबई महापालिका महापौर निवडीच्यावेळी मोदी मोदी घोषणा देणाऱ्या भाजपचा सेना आमदार आज वचपा काढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप आमदारही घोषणाबाजी करत होते. यावेळी मंत्री वगळता सर्वच आमदार कर्जमाफी करताना दिसून आले.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख