Shiv sena ministers will also part with red light on cars | Sarkarnama

शिवसेने मंत्रीही लाल दिवा सोडणार -  दिवाकर रावते 

ब्रह्मदेव चट्टे : सरकारनाम ब्यूरो 
बुधवार, 19 एप्रिल 2017

मुंबई, दि. 19 : केंद्रीय मंत्री मंडळाने गाडीवरचा लाल दिवा काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाचे स्वागत करत आपण ही आपल्या गाडीवर उद्यापासून लाल दिवा वापरणार नसल्याचे ट्वीट्ट केले आहे. त्यानंतर शिवसेना मंत्री दिवाकर रावते यांनीही लाल दिवा सोडण्याचा निर्णय जाहिर केला. तसेच शिवसेनेचे इतर मंत्रीही लाल दिवा सोडणार असल्याचे सांगितले.

आज केंद्रीय मंत्री आणि अधिकारी यांच्या गाडीचा लाला दिवा दि. १ मे २०१७ पासून काढण्यात येणार असल्याचा केंद्रिय मंत्रीमंडळाने निर्णय घेतला आहे. या निर्णयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीय यांनी स्वागत करत आपला लाल दिवा त्यागला आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही लाल दिवा काढून आपला प्रवास केला आहे. त्यानंतर शिवसेना मंत्री दिवाकर रावते यांनीही लाल दिवा सोडण्याचा निर्णय जाहिर केला. तसेच शिवसेनेचे इतर मंत्रीही लाल दिवा सोडणार असल्याचे सांगितले. 
 
अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख