Shiv sena cannot build Lord Ram's temple In Ayodhya : Kishanchand Tanwani | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

 शिवसेना अयोध्येत राम मंदिर बांधू शकत नाही : किशनचंद तनवाणी

जगदीश पानसरे 
बुधवार, 28 नोव्हेंबर 2018

किशनचंद तनवाणी पूर्वी शिवसेनेत होते . शिवसेनेत असताना त्याना औरंगाबाचे महापौरपद भूषविण्याची तसेच विधान परिषदेत आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती . आता भाजपचे शहराध्यक्ष नात्याने त्यांनी शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर शरसंधान केले आहे

औरंगाबादः  " विश्‍व हिंदू परिषद राम मंदिरासाठी गेल्या 25 वर्षांपासून लढा देत आहे, आणि त्यांच्या या लढ्यात भाजप देखील सहभागी आहे. अयोध्येतील लढ्यात हिंदू म्हणून शिवसेना देखील सहभागी होती हे नाकारून चालणार नाही.पण राम मंदिर शिवसेना बांधू शकत नाही, ते विश्‍व हिंदू परिषद आणि हिंदूच बांधू शकतात," असे भाजपचे  शहर-जिल्हाध्यक्ष किशनचंद तनवाणी यांनी सरकारनामाशी बोलतांना सांगितले.  

किशनचंद तनवाणी पूर्वी शिवसेनेत होते . शिवसेनेत असताना त्याना औरंगाबाचे महापौरपद भूषविण्याची तसेच विधान परिषदेत आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली होती . आता भाजपचे शहराध्यक्ष नात्याने त्यांनी शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर शरसंधान केले आहे . 

 श्री. तनवाणी म्हणाले ," शिवसेनेला सोबत यायचे असेल तर त्यांनी नक्की यावे. शिवसेना अयोध्येत राम मंदिर बांधायला गेली होती, त्यांचे प्रमुख तिथे सभा घेणार होते, पण यापैकी काहीच झाले नाही. शिवसेना राम मंदिर बांधू शकत नाही, अयोध्येतील त्यांचा दौरा हा राजकीय हेतूने प्रेरित आणि एक इव्हेंट होता. "

दरम्यान  रामजन्मभूमी राम मंदिर निर्माणासाठी विश्‍व हिंदू परिषदेच्यावतीने औरंगाबादेत रविवारी होणारी हुंकार सभा यशस्वी करण्यासाठी भाजपने तयारी चालली  आहे.

अयोध्येतील रामजन्मभूमी मध्ये राम मंदिराचे भव्य निर्माण करण्यासाठी येत्या रविवारी (ता.2) विश्‍व हिंदू परिषदेच्या वतीने हुंकार सभेचे आयोजन केले आहे. विश्‍व हिंदू परिषदेचे उपाध्यक्ष हुकुमंचद सावला हे या हुंकार सभेला संबोधित करणार आहेत. संत तुकाराम नाट्यगृहात सायंकाळी पाच ते रात्री आठ दरम्यान ही हुंकार सभा होणार आहे. ती यशस्वी व्हावी यासाठी भाजपने देखील कंबर कसली आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख