Shiv Sena - BJP alliance moving ahead by tortoise"s speed | Sarkarnama

शिवसेना भाजपची युती "कासव" गतीने  उद्धव ठाकरे 

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 12 एप्रिल 2017

मुंबई :  शिवसेना भाजपची युती "कासव" गतीने सुरू असल्याचे उद्धव ठाकरे यांनी टोमणा मारला. व्हेंटिलेटरवर असलेल्या शिवसेना भाजपा युतीचे काय ? असा प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आला होता.

कासव आणि व्हेंटिलेटरच्या टीमचे उद्धव ठाकरेनी सत्कार केला यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे बोलत होते. सेनै भाजपच्या संबधावर उद्धव ठाकरे यांच्या या विधानाने वेगवेगळे तर्क लढवले जात आहेत.

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, मराठी कलाकरांचा अभिमान वाटतो. या कलाकारांचे जगात कौतुक होत आहे. मात्र त्यांचे कौतुक घरात करणे आवश्यक अवश्यक असल्याचे सांगत ठाकरे यांनी मराठी चित्रपट महोत्सवाची घोषणा करत असल्याचे सांगितले.

उद्धव ठाकरे म्हणाले, कुलभूषण जाधव यांच्याबद्दल फक्त भावना व्यक्त करून चालणार नाही. तसेच पाकिस्तानला इशारे देवून चालणार नसून आता थेट कारवाई करुन दाखवावी लागेल अशी अपेक्षाही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. जाधव यांना लवकरच परत आणावी अशी अपेक्षा व्यक्त करताना शिवसेना रस्त्यावर उतरून विरोध करते तेव्हा लोकं आमच्यावर टीका करतात, अशी खंतही ठाकरे यांनी व्यक्त केली. मात्र अशी काही घटना झाली की लोकांचे देशप्रेम जागे होते असे सांगून ठाकरे यांनी कुलभूषण जाधव यांच्याबाबत लवकर पावले उचलण्याची अवश्यकता असल्याचे सांगितले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख