shishikant khedekar mla | Sarkarnama

आजचा वाढदिवस : शशिकांत खेडेकर, आमदार, सिंदखेडराजा, बुलडाणा. 

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 15 डिसेंबर 2017

 

 

बुलडाणा जिल्ह्याच्या राजकीय पटलावर शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणून आमदार डॉ. शशिकांत खेडेकर ओळखले जातात. वडील नरसिंगराव खेडेकर यांचा सामाजिक व राजकीय वारसा पुढे नेण्याचे काम डॉ. खेडेकर यशस्वीपणे करीत आहेत. कॉंग्रेसच्या चळवळीतून राजकीय जीवनाला त्यांनी सुरवात केली. ग्रामीण भागातील जनतेच्या समस्या सोडवीत त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली. जिल्हा परिषद सदस्य, अर्थ व बांधकाम सभापती या पदावरही त्यांनी काम करताना आपली छाप पाडली. दरम्यान त्यांनी कॉंग्रेसला सोडचिठ्ठी देत शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला. याकाळात त्यांच्यावर शिवसेना उपजिल्हाप्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती. विधानसभेच्या 2004, 2009 मधल्या निवडणुकीत त्यांना या मतदार संघात पराभवाचा सामना करावा लागला. मात्र, निवडणुकीतील अपयशाने खचून न जाता त्यांनी समाजकारण व राजकारणातील सहभाग सक्रिय ठेवला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख