shirsath and state election | Sarkarnama

बंडखोरीवर शिरसाट यांची मात; राष्ट्रवादीचे पदाधिकारी शिवसेनेत

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद : शिवसेना-भाजप महायुतीचे पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार संजय शिरसाट यांनी भाजप बंडखोरावर मात करत, राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शहराध्यक्षासह अनेक पदाधिकाऱ्यांना शिवसेनेत प्रवेश दिला. उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत नुकताच हा प्रवेश झाला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष विनोद बनकर यांच्या शिवसेना प्रवेशाने संजय शिरसाट यांना आणखी बळ मिळण्याची शक्‍यता वर्तवली जात आहे. 

पश्‍चिम विधानसभा मतदारसंघात महायुतीचे संजय शिरसाट विरुध्द एमायएमचे अरूण बोर्डे, वंचितचे संदीप शिरसाट मैदानात आहेत. तर भाजपचे नगरसेवर राजू शिंदे यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. संजय शिरसाट यांनी मतदारसंघ पिंजून काढतांनाच इतर पक्षातील महत्वाच्या पदाधिकाऱ्यांना पक्षात घेऊन आपली स्थिती आणखी भक्कम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पश्‍चिम शहराध्यक्ष विनोद बनकर यांचा त्यांच्या सहकारी पदाधिकाऱ्यांसह शिवसेनेत झालेला प्रवेश आणि त्यांनी संजय शिरसाट यांना जाहीर केलेला पाठिंबा महत्वचा मानला जातो. बनकर यांना पश्‍चिम मतदार संघातुन वंचितची उमेदवारी जाहीर झाली होती. पण नंतर त्यांना डावलून संदिप शिरसाट यांना उमेदवारी देण्यात आली. त्यामुळे नाराज झालेल्या बनकर यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह महायुतीचे संजय शिरसाट यांना पाठिंबा जाहीर करत तसे पत्रच प्रत्यक्ष भेटून दिले. 

आमदार संजय शिरसाट यांनी मतदार संघाचा केलेला विकास, मतदारांशी असलेली बांधिलकी आणि मतदारांची आपणाला असलेली पसंती हीच आपल्या कामाची पावती आहे. आपण योग्य उमेदवार आहात असे आम्ही मानतो व आपल्या बिनशर्त पाठिंबा जाहीर करतो असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख