shirol election | Sarkarnama

शिरोळ नगरपरिषद निवडणुकीत भाजपला दणका

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 22 ऑक्टोबर 2018

कोल्हापूर : शिरोळ नगरपरिषदेच्या निवडणुकीत कॉंग्रेस - राष्ट्रवादी - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजर्षि शाहू आघाडीने भाजपला दणका दिला आहे. नगराध्यक्षपदी या आघाडीचे अमरसिंह पाटील यांनी भाजपच्या उमेदवाराचा 33 मतांनी पराभव केला. नगराध्यक्षपदासाठी 6 उमेदवार निवडणकू रिंगणात होते. नगरसेवकांच्या 17 जागांसाठी 83 उमेदवार रिंगणात होते. 

कॉंग्रेस - राष्ट्रवादी- स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजर्षि शाहू आघाडीने 9 जागांवर विजय मिळवला. भारतीय जनता पक्षाला 7 जागांवर समाधान मानावे लागले, तर एका जागेवर अपक्ष उमेदवार विजयी झाला. शिरोळ नगरपरिषदेसाठी रविवारी चुरशीने मतदान झाले होते. आठ प्रभागांमध्ये सरासरी 80 टक्के मतदानाची नोंद झाली होती. एकूण 21 हजार 731 मतदारांपैकी 17 हजार 367 मतदारांनी मतदान केले. यामध्ये 8 हजार 244 महिला आणि 9 हजार 123 पुरुषांनी मतदान केले होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख