शिर्डी मतदारसंघासाठी दुपारपर्य़ंत 20 टक्के मतदान; कडक उन्हामुळे मतदार घराबाहेर पडेनात

शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. बहुतेक केंद्रांवर सकाळी गर्दी होती. काही ठिकाणी यंत्रे बंद पडली. दुपारी बारानंतर मात्र कडक उन्हामुळे गर्दी कमी झाली. सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.४३ टक्के, तर ११ वाजेपर्यंत १९.५३ टक्के मतदान झाले.
शिर्डी मतदारसंघासाठी दुपारपर्य़ंत 20 टक्के मतदान; कडक उन्हामुळे मतदार घराबाहेर पडेनात

नगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी आज सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. बहुतेक केंद्रांवर सकाळी गर्दी होती. काही ठिकाणी यंत्रे बंद पडली. दुपारी बारानंतर मात्र कडक उन्हामुळे गर्दी कमी झाली. सकाळी नऊ वाजेपर्यंत ७.४३ टक्के, तर ११ वाजेपर्यंत १९.५३ टक्के मतदान झाले.

शिर्डी लोकसभा मतदारसंघात युतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे, आघाडीचे उमेदवार आमदार भाऊसाहेब कांबळे, तसेच अपक्ष माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यात तिरंगी लढत होत आहे. आज मतदानासाठी सकाळी रांगा लागल्या. आज त्यांचे भवितव्य यंत्रांत बंद होणार आहे.

कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर केंद्रावर मतदान सुरू होण्याआगोदरच यंत्रात बिघाड झाला त्यामुळे समारे दोन तास उशिर झाला. रस्तापूर, देवळाली प्रवरा येथे यंत्रात तांत्रिक बिघाड झाल्याचे सांगण्यात आले. अडीच तासांनी मतदान यंत्रे सुरू करण्यात आले. माका (ता. नेवासे) येथेही केंद्र बंद पडल्याने मतदारांनी संताप व्यक्त केला. याबरोबरच अनेक ठिकाणी यंत्रे बंद पडल्याने एक ते दोन तास उशिराने मतदान सुरू झाले.

लोणी खुर्द येथील केंद्रावर काॅंग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पत्नी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनी विखे पाटील यांच्यासह मतदान केले. भाजपचे डाॅ. सुजय विखे पाटील यांनी पत्नी धनश्री विखे पाटील यांच्यासह मतदान केले. माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी पत्नी कांचन थोरात यांच्यासह मतदानाचा हक्क बजावला. वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार संजय सुखधान यांनी नेवासे शहरातील मराठी शाळेच्या केंद्रावर मतदानाचा हक्क बजावला. 

आमदार सुधीर तांबे यांनी पत्नी दुर्गा तांबे यांच्यासह संगमनेर येथील केंद्रावर मतदान केले. माजी खासदार व ज्येष्ठ साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी सोनई येथे मतदानाचा हक्क बजावला. आमदार स्नेहलता कोल्हे यांनी येसगाव (ता. कोपरगाव) येथील केंद्रावर, तर नेवासेचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी देवगाव येथे मतदानाचा हक्क बजावला. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com