नव्या अर्थक्रांतीसाठी प्रवरेचे मॉडेल महत्त्वाची भूमिका बजावेल : डॉ. काकोडकर

एकेकाळी जगात सर्वाधिक विकासदर असणाऱ्या भारताची औद्योगिक क्रांतीनंतर सुरू झालेली पिछेहाट स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत काम करीत होती. गेल्या दहा वर्षांत परिस्थिती सुधारू लागली. मात्र विकसित देशाईतके दरडोई उत्पन्न वाढले नाही. प्रगत देशातील तंत्रज्ञान, आपली शहरे आणि खेडी असा ज्ञानसेतू आपण करू शकलो, तर प्रगती शक्य आहे. त्यातून नवीन अर्थक्रांती जन्मास येईल. त्यासाठी प्रवरेचे सहकाराचे मॉडेल महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे मत भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.
नव्या अर्थक्रांतीसाठी प्रवरेचे मॉडेल महत्त्वाची भूमिका बजावेल : डॉ. काकोडकर

शिर्डी (जि. नगर)  : एकेकाळी जगात सर्वाधिक विकासदर असणाऱ्या भारताची औद्योगिक क्रांतीनंतर सुरू झालेली पिछेहाट स्वातंत्र्यप्राप्तीपर्यंत काम करीत होती. गेल्या दहा वर्षांत परिस्थिती सुधारू लागली. मात्र विकसित देशाईतके दरडोई उत्पन्न वाढले नाही. प्रगत देशातील तंत्रज्ञान, आपली शहरे आणि खेडी असा ज्ञानसेतू आपण करू शकलो, तर प्रगती शक्य आहे. त्यातून नवीन अर्थक्रांती जन्मास येईल. त्यासाठी प्रवरेचे सहकाराचे मॉडेल महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल, असे मत भारतीय अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर यांनी व्यक्त केले.

सहकार चळवळीचे जनक पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रवरानगर येथील धनंजय गाडगीळ सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विखे साहित्य कला गौरव पुरस्काराचे वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. काकोडकर बोलत होते. अध्यक्षस्थानी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे होते. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.

साहित्यिक रा. र. बोराडे यांना एक लाख रुपयांचा धनादेश देऊन जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. `सकाळ'चे निवासी संपादक अॅड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांनी लिहिलेल्या व `सकाळ'ने प्रकाशित केलेल्या कारभारी अहमदनगर जिल्ह्याचे या पुस्तकासाठी पत्रकार लेखक पुरस्कार, बाबासाहेब मुसळे (झळाळ), कवी महेश लोंढे (नाद्रानाशाची रोजनिशी), हेरंब कुलकर्णी (शिक्षकांसाठी सानेगुरुजी) या साहित्यकृतीबद्दल साहित्यपुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अभिनेते मिलिंद शिंदे यांना कला, कीर्तनकार शामसुंदर सोन्नर यांना समाज प्रबोधन तर दत्ता पाटील यांना नाट्यसेवेबद्दल पुरस्कार बहाल करण्यात आले. 

कार्यक्रमास विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनी विखे पाटील, माजी आमदार अण्णासाहेब म्हस्के, आमदार भाऊसाहेब कांबळे, राजेंद्र विखे पाटील उपस्थित होते.

कारभारी अहमदनगर जिल्ह्याचे हा महत्त्वाचा दस्तावेज : कसबे
पत्रकारांनी साहित्यनिर्मिती देखील करायला हवी. `सकाळ'चे निवासी संपादक अॅड. डॉ. बाळ ज. बोठे पाटील यांनी कारभारी अहमदनगर जिल्ह्याचे हे पुस्तक लिहिले. हे पुस्तक एका अर्थाने महत्त्वाचा दस्ताएेवज आहे. त्याची दखल घेत यंदाच्या वर्षीपासून प्रथमच सुरू करण्यात आलेला पत्रकार लेखक पुरस्कार या पुस्तकाचे लेखक डॉ. बोठे पाटील यांना देण्यात आला, अशी माहिती या वेळी पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष रावसाहेब कसबे यांनी या वेळी दिली.


 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com