आम्ही शरद पवार यांच्यासोबतच - डॉ. राजेंद्र शिंगणे

 आम्ही शरद पवार यांच्यासोबतच - डॉ. राजेंद्र शिंगणे

पुणे : "राजभवनात मिटिंग आहे म्हणून अजितदादांनी बोलावले. राजभवनात शपथविधी आहे हे आम्हाला माहिती नव्हते. त्यांनी बोलावले म्हणून आम्ही गेलो पण आम्ही शरद पवार यांच्यासोबत आहोत असे राष्ट्रवादीचे आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी सांगितले. 

आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीला आमदार शिंगणे उपस्थित होते मात्र त्यांनी नंतर यू टर्न घेतला आहे. 
शिंगणे यांनी शरद पवार यांच्या पत्रकारपरिषदेत हजेरी लावली. ते म्हणाले, " मला पक्षाची मिटिंग आहे म्हणून अजितदादांनी बोलावून घेतलं. नंतर आम्हाला राजभवनात नेण्यात आलं. तिथं एका हॉलमध्ये आम्हाला बसवलं. थोडया वेळाने देवेंद्र फडणवीस आले. त्यानंतर राज्यपाल महोदय आले. त्यांनी फडणवीस यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. नंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. हे सगळे काय चालेले आहे ते आम्हाला कळतच नव्हते . शपथविधी होणार आहे हे आम्हाला माहिती नव्हते' आम्ही शरद पवार यांच्या सोबत आहोत असेही शिंगणे म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com