जयकुमार रावल यांचा काँग्रेस आघाडीमुक्त जिल्ह्याचा नारा

शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीतर्फे चौथ्यांदा उमेदवारी करणारे पर्यटन, अन्न व औषध प्रशासन, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी कॉंग्रेस आघाडी खिळखिळी करून टाकली आहे. प्रचाराच्या सांगतेपूर्वी त्यांनी पक्ष प्रवेशाचा सपाटा लावून कॉंग्रेस आघाडीला मोठा हादरा दिला. कॉंग्रेस आघाडीमुक्त मतदारसंघ आणि जिल्हा, असा नारा देत ते निवडणुकीला सामोरे जात आहेत.
Jaykumar Rawal
Jaykumar Rawal

धुळे : शिंदखेडा विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीतर्फे चौथ्यांदा उमेदवारी करणारे पर्यटन, अन्न व औषध प्रशासन, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी कॉंग्रेस आघाडी खिळखिळी करून टाकली आहे. प्रचाराच्या सांगतेपूर्वी त्यांनी पक्ष प्रवेशाचा सपाटा लावून कॉंग्रेस आघाडीला मोठा हादरा दिला. कॉंग्रेस आघाडीमुक्त मतदारसंघ आणि जिल्हा, असा नारा देत ते निवडणुकीला सामोरे जात आहेत.

शिंदखेडा मतदारसंघातील सरळ लढतीत कॉंग्रेस महाआघाडीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉ. हेमंत देशमुख व परिवार, त्यांचे अनेक कट्टर समर्थक, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष श्‍याम सनेर यांचे समर्थक यांच्यासह आघाडीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी भाजप प्रवेश केला आहे. त्यातून भाजप महायुतीची दुपटीने ताकद वाढवून मंत्री रावल यांनी महाआघाडीला शह देत तगडे आव्हान उभे केले आहे.

मंत्रिपदाच्या माध्यमातून रावल यांनी मतदारसंघासह जिल्ह्यासाठी कोट्यवधींचा विकास निधी खेचून आणला. कायम दुष्काळग्रस्त तालुका, अशी ओळख असलेल्या शिंदखेडा मतदारसंघाला या स्थितीतून बाहेर काढण्यासाठी विडा उचलला आहे. त्यासाठी पदयात्रेतून बुराई परिक्रमा करत 24 बंधारे बांधले. ते चांगल्या पर्जन्यमानामुळे तुडुंब भरले. शिवाय चोवीसशे कोटींची सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजना, प्रकाशा- बुराई उपसा सिंचन योजना येत्या चार वर्षांत पूर्ण करून शिंदखेडा मतदारसंघ सिंचनदृष्ट्या सक्षम होणार आहे. 

त्यातून तालुका दुष्काळमुक्त केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. रेल्वेचे जाळे असलेल्या मतदारसंघात खानदेश एक्‍स्प्रेस सुरू करून राजधानी मुंबईला जोडली. रस्ते, पाणीपुरवठा योजना, पर्यटनस्थळे, तीर्थक्षेत्र विकासासह विकासाच्या विविध क्षेत्रांना चालना दिली. शेतकऱ्यांसाठी राज्यात दीड लाख, तर मतदारसंघासह जिल्ह्यात मिळून दहा हजार विहीर मंजूर केल्या. यासह विविध मुद्दे मांडत उमेदवार मंत्री रावल यांनी प्रचार केला आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी टाकलेल्या जबाबदारीनुसार  रावल यांनी शिरपूर, शिंदखेडा, साक्री विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांसाठी प्रचारात सहभाग नोंदविला आहे. मंत्री रावल यांच्या उमेदवारीमुळे शिंदखेडा मतदारसंघात हायप्रोफाईल निवडणूक होत आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com