शेरकर व बेनके यांचे हम साथ साथ है!

शेरकर व बेनके यांचे हम साथ साथ है!

जुन्नर : आळेफाटा येथील आंदोलनाच्या निमित्ताने आज (ता. ११)  काॅंग्रेसचे सत्यशील शेरकर व राष्ट्रवादीचे अतुल बेनके यांची भेट झाली. यावेळी त्यांनी आम्ही सर्व शेतकरी हिताच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलनाबरोबर असल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान आघाडीतून दोघांनीही आपापल्या पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे. प्रचाराचा धुमधडाका सुरू केला आहे. उमेदवारी कोणालाही मिळो आमचे मित्रत्वाचे संबंध कायम राहतील अशा भावनेने यावेळी त्यांनी एकमेकांचे हात  हातात घेतले.

जुन्नर तालुका काँग्रेस आंदोलनाबरोबर असून तालुकाध्यक्ष अशोक घोलप यांनी येथे भेट दिली असल्याचे  काँग्रेसचे प्रांतिक सदस्य सत्यशील शेरकर यांनी यावेळी नमूद केले. 

ते म्हणाले, गेल्या पंचवीस वर्षांपासून कार्यरत असलेले पिंपळगाव जोगे पाटबंधारे उपविभाग कार्यालय अळकुटी ता. पारनेर येथे स्थलांतरित करण्यास जुन्नर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध आहे. बेनके यांचे आंदोलन शेतकरी हिताचे असून यात आम्ही सर्व सहभागी आहोत. शेतकऱ्यांच्या भावनेचा विचार करून शासनाने हा निर्णय मागे घेतला पाहिजे.


दरम्यान या आंदोलनास सर्व स्तरातून पाठींबा मिळत आहे. पक्षीय नेते व कार्यकर्ते याबरोबर तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी देखील येथे येऊन बेनके यांची भेट घेत असल्याचे पाहावयास मिळत आहे. जुन्नर विधानसभा मतदारसंघ आघाडीत कोणत्या काॅंग्रेसला मिळणार, याची उत्सुकता आहे. हा मतदारसंघ काॅंग्रेसला मिळणार, हे गृहित धरून शेरकर यांनी काम सुरू केले आहे. पवार साहेबांचा शब्द अंतिम असल्याचे सांगत बेनके यांनीही आपली तयारी कायम ठेवली आहे. त्यामुळे प्रत्यक्ष निवडणुकीत या दोघांपैकी आघाडीचा उमेदवार कोण असणार, याची उत्सुकता कायम आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com