कराड उत्तरमधून मनोज घोरपडेच युतीचे उमेदवार : शेखर चरेगावकर

कराड उत्तरमधून मनोज घोरपडेच युतीचे उमेदवार : शेखर चरेगावकर

कऱ्हाड : कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात मनोज घोरपडे हेच भाजप-शिवसेना युतीचे उमेदवार असतील, असे स्पष्ट मत सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांनी व्यक्त केले. कऱ्हाड-जावळवाडी येथील 30 लाख रूपये किमतीच्या राष्ट्रीय पेयजल योजनेचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते झाले. यावेळी मनोज घोरपडे, सरपंच अलका चव्हाण, उपसरपंच प्रभाकर इंगळे, संदीप ओगले, युवराज साळुंखे आणि धनाजी जाधव हे खटाव माण साखर कारखान्याचे संचालक उपस्थित होते. 

श्री. चरेगावकर म्हणाले, कऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघात मनोज घोरपडे हेच महायुतीचे उमेदवार असतील, फक्त चिन्ह कोणते हे ठरायचे आहे. उमेदवार ठरलेले आहेत. यावेळी घोरपडे म्हणाले, पाच वर्षात कऱ्हाड उत्तर मध्ये काम करत असताना फार मोठया प्रमाणात विकासाचा बॅंकलॉंग पाहण्यास मिळाला. आजही कितीतरी गावांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळत नाही. मुख्यमंत्री राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेच्या माध्यमातून प्रत्येक गावाला पिण्यासाठी स्वच्छ पाणी देण्यासाठी काम करत असून त्या माध्यमातून लोकांचे आरोग्य चांगले राहणार आहे. 

यावेळी महेश जाधव, इंद्रजीत ताटे, सुधीर शेळके, सतीश काटकर, अमोल चव्हाण, सयाजी जगताप, सुनिल धुमाळ, भिकू शेळके, हणमंत काटकर, आबाजी काटकर, संभाजी काटकर, उत्तम काटकर, धनाजी जगताप, जनार्दन जगताप, बापूराव फडतरे, विक्रम फडतरे, अभिषेक काटकर, रामचंद्र संकपाळ, सुखदेव शेटे, विकास जगताप, अरूण जाधव, शशिकांत शेळके उपस्थित होते. सुधीर शेळके यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. सतीश काटकर यांनी आभार मानले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com