Shefali Bhujbal Demand Inquiry about the Mobiles give to Helth Workers | Sarkarnama

आरोग्य परिचारिकांना दिलेल्या मोबाईलमध्ये अश्‍लील चित्रफित : शेफाली भुजबळ

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 9 मार्च 2019

महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या नव्या स्मार्ट फोनमध्ये चक्क अश्‍लील चित्रफित, अश्‍लील छायाचित्र आढळले. त्याबाबत महिला कर्मचाऱ्यांनी तक्रार केली

नाशिक : महिला दिनाच्या पूर्वसंध्येला नाशिक महापालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांना केंद्रीय आरोग्य विभागाच्या वतीने दिलेल्या नव्या स्मार्ट फोनमध्ये चक्क अश्‍लील चित्रफित आणि अश्‍लील छायाचित्र आढळले. त्याचा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने डॉ. शेफाली भुजबळ यांच्या उपस्थितीत महापालिकेसमोर निदर्शने करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करीत केंद्र सरकार, राज्यसरकारचा निषेध करण्यात आला.

यासंदर्भात राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या वतीने महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांना निवेदन देण्यात आले. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या नव्या स्मार्ट फोनमध्ये चक्क अश्‍लील चित्रफित, अश्‍लील छायाचित्र आढळले. त्याबाबत महिला कर्मचाऱ्यांनी तक्रार केली. 'प्रशिक्षणासाठी देण्यात आलेल्या या नवीन स्मार्ट फोनमध्ये अश्‍लील चित्रफित आणि छायाचित्र असणे हा प्रकार अत्यंत घृणास्पद आहे. प्रशासनाने नव्या मोबाईलमध्ये आधीपासूनचे फोटो व्हीडोओ असल्याने हे मोबाईल नवीन आहे की नाही अशा शंका निर्माण होते. यामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा संशय आहे. याबाबत तांत्रिक कारण देत मोबाईल पुन्हा जमा करून घेण्यात आले असले तरी या घडलेल्या या घृणास्पद प्रकरणाची सखोल चौकशी करून सबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी' अशी मागणी केली आहे.

यावेळी डॉ. भुजबळ, योगिता हिरे, महानगरपालिकेच्या माजी विरोधी पक्षनेत्या कविता कर्डक, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, नगरसेविका सुषमा पगारे, माजी नगरसेविका चित्रा तांदळे, पूनम वीर, सुरेखा निमसे, दीपा कमोद, शोभा आवारे, सरिता पगारे, मनीषा अहिरराव, रजनी चौरसिया, मीनाक्षी गायकवाड, शाकेरा शेख, माधवी पहेकर, शकिरा शेख, साहिरा शेख, सलमा शेख यांच्यासह मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख