मुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या कारभाऱ्यांचा हट्ट केला पूर्ण; अतिरिक्त आय़ुक्त उगले यांची नागपूरला बदली

मुख्यमंत्र्यांनी पुण्याच्या कारभाऱ्यांचा हट्ट केला पूर्ण; अतिरिक्त आय़ुक्त उगले यांची नागपूरला बदली

पुणे : पुणे महापालिकेतील भाजप पदाधिकाऱ्यांच्या हट्टाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अखेर मान्यता दिल्याने महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शितल उगले- तेली यांची बदली आज करण्यात आली. त्यांच्या जागी शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रूबल अग्रवाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उगले यांच्याकडे नागपूर प्रदेश प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

पालिकेतील सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या नेतृत्त्वाखाली शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन उगले यांच्या बदलीची मागणी केली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांचे कान टोचले होते. मात्र पदाधिकारी उगलेंच्या बदलीवर अडून बसल्याने अखेर मुख्यमंत्र्यांनी त्यांचा हट्ट पूर्ण केला. 

उगले यांची 11 मे 2017 रोजी महापालिकेत नियुक्ती झाली होती. त्यांनी प्रशासनाला शिस्त लावण्याचा प्रयत्न काल होता. त्यामुळे पदाधिकारी नाराज होते. पालिकेतील अनाठायी खर्चास पायबंद घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या उगले यांची बदली केल्याने भाजपच्या पारदर्शक कारभाराच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 

शितल उगले यांच्या रिक्त होणाऱ्या अतिरिक्त आयुक्तपदावर रूबल प्रखेर- अगरवाल यांची राज्यशासनाकडून नियुक्ती करण्यात आलेली आहे. सध्या त्यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री साईबाबा संस्थान विश्‍वस्थ व्यवस्था शिर्डी या पदाचा पदभार आहे. अगरवाल या 2008 च्या भारतीय प्रशासकीय सेवेतील बॅचच्या अधिकारी असून रूबल यांनी या पूर्वी अहमदनगर जिल्हाधिकारी, जळगाव जिल्हाधिकारी म्हणून काम पाहिले आहे. त्यानंतर मार्च 2017 मध्ये त्यांची शिर्डी येथे बदली करण्यात आली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com