जवानाच्या पत्नीचे सांत्वन करताना जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळेंचे डोळेही पाणावले

गुजरात सीमेवर नियुक्ती असलेल्या योगेश लांडगे यांचे दोन दिवसापूर्वी अपघातात निधन झाले. त्याच्यावर मंगळवारी मुळ गावी चिंचोली (सिन्नर) येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जवान योगेश यांच्या पश्चात तीन वर्षांची मुलगी आदिती, आई, राज्य परिवहन महामंडळात चालक असलेले वडील आहेत.
जवानाच्या पत्नीचे सांत्वन करताना जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळेंचे डोळेही पाणावले

नाशिक  : चिंचोली येथील लष्करी जवान योगेश मनोहर लांडगे यांचे गुजरात येथे अपघातात निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी सहा महिन्याच्या तान्ह्या मुलासह लहान मुलगी असलेल्या जवानाच्या पत्नीचे सांत्वन करताना जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांनाही गलबलून आले. या भावविवश प्रसंगी सगळेच उपस्थित सुन्न झाले होते.

गुजरात सीमेवर नियुक्ती असलेल्या योगेश लांडगे यांचे दोन दिवसापूर्वी अपघातात निधन झाले. त्याच्यावर मंगळवारी  मुळ गावी चिंचोली (सिन्नर) येथे लष्करी इतमामात अंत्यसंस्कार झाले. यावेळी पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. जवान योगेश यांच्या पश्चात तीन वर्षांची मुलगी आदिती,  आई, राज्य परिवहन महामंडळात चालक असलेले वडील आहेत. जवान योगेश यांनी गावी येण्यासाठी रजा घेतली होती. रेल्वेचे आरक्षण केले होते. ते बाईकने पत्नी व मुलांसह रेल्वे स्थानकाकडे जाताना अपघात झाला. त्यातच त्यांचा मृत्यू ओढवला.

जवान लांडगे यांच्या पत्नीसविताचे सांत्वन करताना जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांनी त्यांना धीर दिला. यावेळी अपघाताची माहिती सांगताना सविता महिलांच्या गराड्यात दु:खावेगाने ओक्साबोक्सी रडत होत्या. ते चित्र पाहून शीतल सांगळे यांनाही गलबलून आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे यांनी लांडगे यांना पुष्पचक्र अर्पण केले. तहसीलदार राहूल कोरडे, देवळाली स्कूल ऑफ आर्टीलरीचे  कर्नल जगदीश कुमार, सादीक मकानदार, जिल्हा परिषद सदस्य सुनिता सानप यांनी जवान लांडगे यांना श्रध्दांजली अर्पण केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com