भाजपचे शत्रुघ्न सिन्हा म्हणाले, लालूप्रसाद मोठ्या भावासारखे !

shatrunghn-sinha.
shatrunghn-sinha.

पाटणा:  बिहारी बाबू शत्रुघ्न सिन्हा यांनी राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांची भेट घेतल्यामुळे बिहारच्या राजकीय वर्तुळात तर्क सुरू झाले आहेत. मात्र, सध्या खरमास सुरू असल्याने आमचे राजकीय मुद्द्यांवर काही बोलणे झाले नसल्याचा दावा सिन्हा यांनी केला आहे.

सिन्हा काहीही म्हणत असले, तरी ते आगामी लोकसभा निवडणुकीत 'राजद'कडून लढण्याची चर्चा सुरू झाली आहे. ते सध्या भाजपचे पाटणा साहेब मतदारसंघाचे खासदार आहेत. मात्र, पक्षनेतृत्वावर सिन्हा यांनी सोडलेल्या टीकास्त्रामुळे त्यांना पुन्हा उमेदवारी दिली जाण्याची शक्‍यता फारच कमी आहे. सिन्हा यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी आणि राजदकडून पाठिंबा मिळण्याचाही अंदाज आहे. बिहारमध्ये कॉंग्रेस आणि राजदची युती आहे.   
 

लालूप्रसाद यांच्यावर सध्या रांचीतील रिम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सिन्हा यांनी रविवारी तेथे त्यांची भेट घेतली. कॉंग्रेसचे माजी खासदार सुबोधकांत सहाय , झारखंड मुक्ती मोर्चाचे हेमंत सोरेन ,काँग्रेस नेते  अहेमद शकील हेही या वेळी उपस्थित होते. 

लालूप्रसाद यांच्याबरोबर राजकीय चर्चा झाली नसल्याचे सांगतानाच सिन्हा यांनी, "तेजस्वी यादव फार चांगला मुलगा असून, तोच बिहारचे भवितव्य आहे,' असा डायलॉग मात्र मारला. लालूप्रसाद यांच्याबरोबर माझे कौटुंबिक संबंध आहेत. ते मला मोठ्या भावाप्रमाणे आहेत. सुख-दुःखात आम्ही एकत्र असतो, असेही ते म्हणाले.

या भेटीवर केलेल्या ट्विटमध्येही त्यांनी लालू प्रसाद यादव यांची तरल विनोद बुद्धी कायम असल्याचे म्हंटले आहे . 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com