शशिकांत शिंदे प्रदेशाध्यक्ष होणार पण...

आता राजकीय हानी भरून काढण्यासाठी त्यांना एप्रिलमध्ये विधान परिषदेवर घेतले जाणार आहे. शिवाय प्रदेशाध्यक्षपदासाठी ते सक्षम असून पक्षाचे नेतृत्व चांगल्या पद्धतीनेकरू शकतात, या हेतूने शरद पवार यांनी त्यांच्या नावाला पसंती दिली आहे.
 Shashikant Shinde
Shashikant Shinde

सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी कोरेगावचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांची निवड निश्चित झाल्याच्या पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.  याचर्चेला खुद्द शशिकांत शिंदे यांनी दुजोरा दिला आहे.  

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महाविकास आघाडीत सामील होऊन सत्तेत सहभागी झाल्यानंतर सुरवातीच्या टप्प्यात राष्ट्रवादीला दोन मंत्रीपदे दिली. यामध्ये प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे अर्थमंत्री पदाचा कार्यभार दिला गेला. त्यामुळे त्यांच्यावरील पक्ष संघटनेचा भार कमी करण्यासाठी त्यांच्याकडील प्रदेशाध्यक्षपद दुसऱ्या सक्षम नेत्याला देण्याची प्रक्रिया सुरू झाली. त्यासाठी धनंजय मुंडे व शशिकांत शिंदे यांच्या नावाला पसंती दिली गेली. पण धनंजय मुंडे यांच्याकडे दुसरी जबाबदारी दिली जाणार असल्याने त्यांच्या ऐवजी श्री. शिंदे यांचे नाव पुढे आले आहे. 

सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीची पक्ष संघटना वाढविण्यासोबत लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत शिंदे यांनी चांगले काम केले आहे. पण त्यांना कोरेगाव मतदारसंघात पराभव पत्करावा लागला. आता राजकीय हानी भरून काढण्यासाठी त्यांना एप्रिलमध्ये विधान परिषदेवर घेतले जाणार आहे. शिवाय प्रदेशाध्यक्षपदासाठी ते सक्षम असून पक्षाचे नेतृत्व चांगल्या पद्धतीने करू शकतात, या हेतूने शरद पवार यांनी त्यांच्या नावाला पसंती दिली आहे. 

यापार्श्वभुमीवर दोन दिवसांपासून सोशल मीडियावर त्यांचे अभिनंदन करणाऱ्या पोस्ट व्हायरल होत आहेत. त्यांच्याशी संपर्क करून खरी परिस्थिती जाणून घेतली. त्यावेळी शशिकांत शिंदे यांनी या प्रदेशाध्यक्षपदासाठी त्यांना संधी दिली जाणार असल्याबाबत दुजोरा दिला. पण ही निवड मंत्रिमंडळ विस्तारानंतर होणार आहे, असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादीच्या प्रदेश प्रतिनिधींची बैठक होऊन त्यामध्ये ही घोषणा केली जाणार आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com