Shashikant shinde vs shivendra raje bhosale | Sarkarnama

शशिकांत शिंदे विरूध्द शिवेंद्रसिंहराजे भोसले होणार महामुकाबला 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 22 मार्च 2018

कुडाळ : सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे दोन दिग्गज आमदार एकमेकांच्या विरोधात जावलीच्या मैदानात उतरणार आहेत. कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे व साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात हा महामुकाबला रंगणार आहे.

कुडाळ : सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे दोन दिग्गज आमदार एकमेकांच्या विरोधात जावलीच्या मैदानात उतरणार आहेत. कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे व साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात हा महामुकाबला रंगणार आहे.

वाचून धक्का बसला असला तरी हे सत्य आहे. निमित्त आहे ते साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भासले यांच्या वाढदिवसादिवशी कुडाळ (ता. जावळी) येथे जावली क्रिकेट किंग 2018 चषक हा क्रिकेटचा सामना होणार आहे. यामध्ये शशिकांत शिंदे टायगर्स विरूध्द शिवेंद्रसिंहराजे 1111 या दोन संघात क्रिकेटचा रंगतदार सामना बुधवारी (ता. 28) होणार आहे. दोन्ही संघाचे नेतृत्व स्वत: दोन्ही आमदार प्रत्यक्षात मैदानात उतरून करणार आहेत. अशा प्रकारचा सामना जिल्ह्यात पहिल्यांदाच होत असल्याने क्रिकेटशौकिनांसह राजकीय खेळाडू व कार्यकत्यांत या सामन्याविषयी औत्सुक्‍य निर्माण झाले आहे. 

फेसबुक व व्हाटस्‌ अॅपवर सामन्याची चर्चा 
हा सामान पाहण्यासाठी जिल्ह्यातील युवकांची गर्दी होणार असल्याने या सामन्याचे युट्यूब द्वारे थेट प्रसारण केले जाणार आहे. सध्या फेसबुक व व्हाटस्‌अपवर या सामन्याच्या पोस्ट व्हायरल झाल्या आहेत. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख