shashikant shinde upset | Sarkarnama

मोकळ्या खुर्च्या पाहून आमदार शशिकांत शिंदे संतापले! 

सरकारनामा ब्युराे
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

सातारा : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संसदीय कारकिर्दीस 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल जिल्हावासियांतर्फे येत्या 13 नोव्हेंबरला त्यांचा सत्कार करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी आयोजित केलेल्या बैठकीकडे कार्यकर्त्यांनी पाठ फिरविली. मोठ्या संख्येने खुर्च्या रिकाम्या राहिल्याने आमदार शशिकांत शिंदे संतापले. 

पक्षाची स्थापना झाल्यापासून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सत्तेत होते. मात्र लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यामुळे राष्ट्रवादी कार्यकर्ते सत्तेपासून बाजूला गेले. जनतेने त्यांना विरोधकांची जबाबदारी दिली, मात्र ती पार पाडण्यास कार्यकर्ते अनुत्सुक आहेत.जिल्हास्तरावर विविध कारणांसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने काढलेले मोर्चे, आंदोलने असोत कार्यकर्त्यांची संख्या कमी होत आहे. सध्या जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांसाठी राष्ट्रवादीचे एल्गार मोर्चे सुरू आहेत. पण दोन चार तालुके वेगळता उर्वरित तालुक्‍यात मोर्चाला कार्यकर्त्यांची उपस्थिती रोडावलेली दिसते. खासदार शरद पवारांच्या सत्काराच्या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी राष्ट्रवादी भवनात झालेल्या बैठकीस मोजून शंभर ते दिडशे कार्यकत उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व सत्तास्थाने राष्ट्रवादीकडे असूनही विविध पदावर कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांनीही या बैठकीस दांडी मारली. निम्म्यापेक्षा अधिक खुर्च्या रिकाम्या राहिल्याने पक्षाचे प्रतोद आणि कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे संतप्त झाले. केवळ पदासाठी आणि निवडणुकीसाठी पक्ष हवा असे वाटणाऱ्या कार्यकर्त्यांना पदावरून दूर करा, असा सल्लाही त्यांनी पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना दिला. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख