समजूत घालायला गेलेल्या शशिकांत शिंदेंनाच उदयनराजेंकडून ऑफर!

मागील वेळी आम्ही यांचाच प्रचार केला होता, असे सांगून आमची मैत्री घट्ट आहे पण ती तुम्ही पातळ करू नका, असा सल्ला उदयनराजेंनी पत्रकारांना दिला.
समजूत घालायला गेलेल्या शशिकांत शिंदेंनाच उदयनराजेंकडून ऑफर!

सातारा : राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या भोवती आज दिवसभर राजकिय वातावरण फिरत राहिले. पक्षप्रतोद आमदार शशिकांत शिंदेनी दुपारी शासकिय विश्रामगृहात त्यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ते राष्ट्रवादी सोबत राहण्याच्या मनस्थितीत नसल्याचे यावेळी झालेल्या चर्चेतून स्पष्ट झाले 

शासकिय विश्रामगृह आज राजकिय घडमोडीचे केंद्र बनले होते. दिवसभर खासदार उदयनराजे भोसले आपल्या समर्थकांसह येथे उपस्थित होते. त्यांनी आपल्या विश्‍वासू कार्यकर्त्यांसोबत भाजप प्रवेशासंदर्भात चर्चा केली. त्यामुळे शासकिय विश्रामगृहात आज राजकिय कार्यकर्त्यांचा राबता राहिला. उदयनराजेंच्या भाजप प्रवेशात मुख्य अडथळा हा विधानसभेच्या निवडणुकीसोबत लोकसभेची पोटनिवडणुक होणे हा आहे. हे निवडणुक आयोगाने मान्य केले तर उदयनराजेंचा भाजप प्रवेश आणि खासदारकी सुखकारक होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यासाठी ते काल जाणार होते. मात्र, त्यांनी विचार करण्यास एक दिवसांचा अवधी घेतला. आज दिवसभर त्यांनी आपल्या समर्थकांशी चर्चा केली. त्यानंतर दुपारी राष्ट्रवादीचे पक्ष प्रतोद आमदार शशिकांत शिंदे यांनी त्यांची विश्रामगृहात भेट घेतली. 

दोघा नेत्यांनी अर्धातास कमराबंद चर्चा केली. या चर्चेत उदयनराजेंनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये जाऊ नये, अशी अपेक्षा शशिकांत शिंदेंनी मांडली. तसेच पक्षाच्या शिव स्वराज्य यात्रेत सहभागी व्हावे, असेही सांगितले. मात्र, उदयनराजेंकडून हवा तेवढा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. उलट ते भाजप प्रवेश करतील, असाच त्यांचा सूर होता. तर उदयनराजेंनीही आमदार शिंदेंनाही तुम्ही सुध्दा विचार करा, असा सल्ला दिल्याचे सांगण्यात आले. 

ही कमराबंद चर्चा पूर्ण झाल्यानंतर पंढरपूरच्या विठ्ठल रूक्‍मिणी मंदीर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले हे शासकिय विश्रामगृहात आले. त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासोबत सुमारे तासभर कमराबंद चर्चा केली. यावेळी त्यांच्यासमवेत माजी सभापती सुनील काटकर उपस्थित होते. या चर्चेनंतर दोघेही बाहेर आले. त्यावेळी त्यांना आजच्या भेटीचे कारण विचारले असता, आम्ही जुने मित्र आहोत, असे दोघांनीही सांगितले. तर मित्र असल्याने आम्ही भेटू शकत नाही का, असा प्रश्‍न उदयनराजेंनी उपस्थित केला. ही मैत्री तुम्ही घट्ट करणार का, या प्रश्‍नावर अतुल भोसलेंनी आमची मैत्री घट्टच आहे, असे स्पष्ट केले. तर मागील वेळी आम्ही यांचाच प्रचार केला होता, असे सांगून आमची मैत्री घट्ट आहे पण ती तुम्ही पातळ करू नका, असा सल्ला उदयनराजेंनी पत्रकारांना दिला.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com