फुटीर आमदारांना शोधण्याची जबाबदारी शशिकांत शिंदेंवर!

राजेंद्र शिंगणे, संदीप क्षीरसागर या आमदारांनी आम्हाला फसवून राजभवनावर नेल्याचे सांगितले.
फुटीर आमदारांना शोधण्याची जबाबदारी शशिकांत शिंदेंवर!

मुंबई: राष्ट्रवादीतील फुटीर आमदारांना शोधण्याची जबाबदारी माजी मंत्री आणि माथाडी नेते शशिकांत शिंदे यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

आज सकाळी पक्षाला अंधारात ठेवून अजित पवार यांनी भाजपशी हातमिऴवणी केली. मुख्यमंत्री फडणवीसांसोबत त्यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांच्याबरोबर राष्ट्रवादीचे 12 आमदार असल्याची बातमी आली. पुढे दिवसभर वेगवान घडामोडी घडत आहेत. शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेवून अजित पवार यांच्या निर्णयाबरोबर पक्ष नसल्याचे सांगत कारवाईचे संकेत दिले. त्याचवेळी अजित पवारांबरोबर राजभवनावर गेलेल्या काही आमदारांना पवारांनी पत्रकारांशी बोलायला लावले. राजेंद्र शिंगणे, संदीप क्षीरसागर या आमदारांनी आम्हाला फसवून राजभवनावर नेल्याचे सांगितले.

त्यानंतर उर्वरित आमदारांना शोधून पक्षात आणण्याची जबाबदारी शरद पवार यांनी कोरेगावचे माजी आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर सोपवली. त्यानुसार शिंदे यांनी काही ठिकाणी शोधाशोध केली. मात्र आमदार आढळून आले नाहीत. त्यामुळे शिंदे परतले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com