shashikant shinde said m not playing slowly | Sarkarnama


ब्रेकिंग न्यूज

उन्मेश जोशी यांची ईडीकडून गेल्या पाच तासापासून चौकशी

मी टुकूटुकू खेळत नाही, माझी बॅटींग सेंचुरी करणारी : शशिकांत शिंदे 

सरकारनामा ब्युरो
बुधवार, 10 ऑक्टोबर 2018

कोरेगाव ः "मी कधी टुकूटुकू खेळत नाही, मैं भी शिंदे हूँ, माझी बॅटींग सेंचुरी करणारी असते. टुकूटुकू खेळणारे येत्या 19 नंतर झोपतील', अशा शब्दांत आमदार शशिकांत शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. 

कोरेगाव ः "मी कधी टुकूटुकू खेळत नाही, मैं भी शिंदे हूँ, माझी बॅटींग सेंचुरी करणारी असते. टुकूटुकू खेळणारे येत्या 19 नंतर झोपतील', अशा शब्दांत आमदार शशिकांत शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला. 

माझ्या वाढदिवसानिमित्त येत्या 19 तारखेला "राष्ट्रवादी'चे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थित कोरेगावात होणाऱ्या मेळाव्यात पश्‍चिम महाराष्ट्रातून लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाईल, असे नमूद करत निष्ठा काय असते, याचेही उत्तर यावेळीच देईन, अशा शब्दांत शिंदे यांनी पक्षांतर्गत विरोधकांनाही फटकारले. 

आमदार शशिकांत शिंदे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमांचे नियोजन करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या कोरेगाव येथील बैठकीत ते बोलत होते. 

ते म्हणाले, आपला जिल्हा हा "राष्ट्रवादी'चे अध्यक्ष शरद पवार यांना मानणारा पक्षाचा बालेकिल्ला असून यापुढेही तो कायम राहिल. यापूर्वी कधीही जातीवादी पक्षांनी डोके वर काढले नव्हते; परंतु आता गांधींची हत्या करणाऱ्यांच्या समर्थकांकडून पदयात्रा काढली जात आहे. दोन वर्षांपूर्वीही मुख्यमंत्री पेयजल व ग्रामसडक योजना होती. त्यावेळी कोणी "पोस्टर' लावलेली नव्हती. मात्र, आता निवडणुक आल्याने मतदारसंघात कोणालाही आमदारकीची स्वप्ने पडू लागली आहेत. मात्र, मी कधी इंजेक्‍शन देईन, ते कळणारही नाही.'' 

पक्षांतर्गत विरोधकांना उद्देशून श्री. शिंदे म्हणाले, ""आजूबाजूचीही थोडी हालली आहेत. त्यांच्यापैकी निम्मी शेवटच्या टप्प्यात आणतो. पण तुमची परवानगी असेल तर अन्यथा "आऊटगोईंग' सुरु व्हायचे. पक्षाध्यक्ष पवार यांनी गेल्याच आठवड्यातील कोरेगाव दौऱ्यात माझ्या कार्यपद्धतीचे कौतुक केले, हा माझा सन्मान समजतो.'' या वर्षीपासून वाढदिवसानिमित्त वारकरी सेवा गौरव पुरस्कार सुरु करणार आहे. पहिल्या पुरस्काराचे वितरण येत्या 21 तारखेला हभप ढोक महाराज यांच्या कीर्तनाच्या कार्यक्रमात होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

हेलिकॉप्टरलाही लागते "राष्ट्रवादी'ची परवानगी 
शिंदे म्हणाले, ""काही दिवसांपूर्वी खटावला विरोधकांचा कार्यक्रम झाला, तेव्हा त्यांचे हेलिकॉप्टर जरंडेश्‍वर कारखान्यावर उतरले. त्यावरुन त्यांना या मतदारसंघात येण्यासाठी "राष्ट्रवादी'च्या परवानगीची गरज लागत असल्याचे स्पष्ट होते. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख